चीनच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. सोमवारी रात्री Long March 7A या रॉकेटच्या साहाय्याने ChinaSat-4B या अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्याचा अवकाशातच भीषण स्फोट झाला. यामुळे रॉकेटसह सॅटेलाइटही नष्ट झाला आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

चीनच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेला दक्षिण चीन समुद्रावर मोठा धक्का बसला आहे. ChinaSat-4B हा दळणवळण सॅटेलाईट घेऊन जाणाऱ्या Long March 7A या 60 मीटर लांबीच्या चिनी रॉकेटचा उड्डाणानंतर अवघ्या 85 सेकंदांत अवकाशात भीषण स्फोट झाला. या अपघातात रॉकेट आणि सॅटेलाईट दोन्ही पूर्णपणे नष्ट झाले आहेत.
मूळ कारणाचा तपास सुरू
चीनची अधिकृत वृत्तसंस्था Xinhua ने दिलेल्या वृत्तानुसार, हे रॉकेट सोमवार, 10 ऑगस्ट 2026 रोजी बीजिंग वेळेनुसार रात्री 8:02 वाजता हैनान बेटावरील ‘वेनचांग स्पेस लाँच साईट’वरून झेपवले होते. मात्र, उड्डाण दरम्यान अचानक निर्माण झालेल्या ‘इन-फ्लाईट अनोमली’ (तांत्रिक बिघाड) मुळे ही मोहीम अयशस्वी ठरली. चीनच्या अंतराळ प्रशासनाकडून सध्या या अपघाताच्या मूळ कारणाचा सखोल तपास सुरू आहे. (REF.)
आणि सोशल मीडियावरील फुटेज
‘South China Morning Post’ च्या रिपोर्टनुसार, प्रक्षेपण स्थळाजवळ उपस्थित असलेल्या नागरिकांनी समाजमाध्यमांवर याचेअनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यामध्ये उड्डाणानंतर अवघ्या 90 सेकंदांच्या आत रॉकेटमधून काळा धूर आणि आगीचे गोळे बाहेर पडताना दिसले. इन्फ्रारेड ट्रॅकिंग फुटेजच्या प्राथमिक विश्लेषणावरून असे दिसून येते की, स्फोटापूर्वी रॉकेटचा वरचा भाग (Upper Section) अचानक तुटला किंवा वाकला होता. (REF.)
खगोलशास्त्रज्ञांचे मत काय?
‘सेंटर फॉर स्पेस एन्व्हायरनमेंटलिझम’चे सदस्य आणि ख्यातनाम प्राध्यापक Jonathan McDowell यांच्या मते, हा स्फोट अत्यंत कमी उंचीवर आणि कमी वेगात झाला. त्यामुळे रॉकेटचे कोणतेही अवशेष किंवा सॅटेलाईट पृथ्वीच्या कक्षेत पोहोचू शकले नाहीत. अंतराळ निरीक्षकांच्या मते, रॉकेटमधील अंतर्गत बिघाडामुळे स्वयंचलित ‘फ्लाईट टर्मिनेशन सिस्टम’ सक्रिय झाली असावी, ज्यामुळे रॉकेट हवेतच उडवून देण्यात आले.
‘YF-100 इंजिन’च्या प्रेशर लॉगमधील त्रुटी
‘SatNews’ या (REF.) अंतराळ क्षेत्रातील नामांकित पोर्टलने नमूद केले की, हा अपघात ‘मॅक्स-क्यू’ (Max-Q – हवेचा सर्वाधिक दाब असणारा टप्पा) पार केल्यानंतर झाला. या रॉकेटमध्ये वापरण्यात आलेल्या ‘YF-100 इंजिन’च्या प्रेशर लॉगमधील त्रुटी किंवा मुख्य टप्प्यातील ‘स्ट्रक्चरल फेल्युअर’ (रॉकेटची रचना कोलमडणे) या स्फोटाला कारणीभूत असण्याची दाट शक्यता आहे. (REF.)
इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया
SpaceX चे प्रमुख इलॉन मस्क यांनी ‘X’ (आधीचे ट्विटर) वर या अपयशावर भाष्य करताना म्हटले की, “रॉकेट्स बनवणे आणि ते अंतराळात पाठवणे अत्यंत कठीण काम आहे”. चीन या अपयशातून लवकरच सावरले, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. (REF.)
भविष्यातील मोहिमांवर होणारा परिणाम
‘Reuters’ च्या वृत्तानुसार, Long March 7A चे 2020 मधील पहिल्या उड्डाणानंतरचे हे पहिलेच मोठे अपयश आहे. या इंजिनचा वापर चीनच्या आगामी महत्त्वाकांक्षी Chang’e-7 या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मोहिमेसाठीच्या रॉकेटमध्येही केला जाणार आहे. त्यामुळे या तपासाच्या निष्कर्षांवर चीनच्या पुढील अनेक मोहिमांचे भवितव्य अवलंबून असेल.

