शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील महत्त्वाचे शिलेदार आणि वरळी मतदारसंघातील आदित्य ठाकरेंचे खंदे समर्थक मानले जाणारे सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. या एकाच घडामोडीने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. याला एकनाथ शिंदे यांचे ‘धक्कातंत्र’ मानले जात आहे. हा धक्का फक्त पक्षांतर्गत नाही, तर थेट ठाकरेंच्या आमदारानं शिंदेंच्या कोट्यातून विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी हा अर्ज दाखल केल्यानं हा मोठा धक्का मानला जातोय. ठाकरेंचे आमदार आता शिंदेंसोबत जाणार अशी चर्चा असताना आता सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे वाट धरली आहे. हा केवळ एका नेत्याचा पक्षांतर किंवा अर्ज दाखल करण्याचा विषय नाही, तर यामागे मुंबईचे आगामी राजकारण, वरळी मतदारसंघातील वर्चस्व आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्याची मोठी रणनीती दडलेली आहे. सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली? ही ऑपरेशन टायगर ३.० ची सुरुवात आहे का? तेच या व्हिडिओतून समजून घेऊया..