Headlines

३० हून अधिक बड्या कलाकारांची फौज ,सिनेमाचं बजेट नेमकं किती कोटी? अहमद खान यांचा मोठा खुलासा


Ahmed Khan on welcome to the Jungle Budget:हिंदी बॉक्स ऑफिसवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेलकम टू द जंगल’ हा सिनेमा चांगलाच चर्चेत झालाय. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचं बजेट नेमकं किती आहे, असा प्रश्न प्रेक्षक विचारत होते.

welcome to the Jungle Budget:
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: ‘ वेलकम टू द जंगल ‘ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी आणि राजपाल यादव यांच्यासह ३० पेक्षा जास्त दिग्गज कलाकारांची तगडी फौज असलेल्या या चित्रपटाच्या बजेटबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक माध्यमांमध्ये या चित्रपटाचे बजेट २५० ते ३०० कोटी असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला असून चित्रपटाच्या बजेटबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

Maharashtra TimesAshok and Nivedita Saraf: खऱ्या अर्थाने कपल गोल्स! अशोक मामांनी निवेदितांना दिलेला आशीर्वाद झाला खरा, सिनेमाच्या सेटवर प्रेमाची जाणीव, अन् गोव्यात लग्न
चित्रपट केवळ १२५ कोटींत तयार!
दिग्दर्शक अहमद खान यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं की, एवढी मोठी स्टारकास्ट, गाणी आणि अ‍ॅक्शन सीक्वेन्स असूनही चित्रपटाचा एकूण खर्च ११५ ते १२५ कोटी रुपयांच्या वर गेलेला नाही.

अहमद खान म्हणाले, की व्याज धरूनही मी १२५ कोटींचा आकडा ओलांडलेला नाही. आम्ही बजेटचे योग्य नियोजन केलं होतं. विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच डिजिटल, सॅटेलाइट, म्युझिक आणि ओव्हरसीज राइट्सच्या माध्यमातून निर्मात्यांनी हा संपूर्ण खर्च वसूल केला आहे. त्यामुळे आता थिएटरमधून होणारी कमाई हा थेट नफा आहे.

फक्त ७५ शिफ्ट्समध्ये शूटिंग पूर्ण
एवढ्या मोठ्या स्टारकास्टला एकत्र घेऊन चित्रपटाचं शूटिंग वेळेत पूर्ण करणं हे मोठे आव्हान होतं. अहमद खान यांनी सांगितलं की, संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग अवघ्या ७५ शिफ्ट्समध्ये पूर्ण झालंय. प्रत्येक शिफ्ट ही ८ तासांची असायची, ज्यामध्ये प्रत्यक्ष शूटिंग ६ ते ६. ५ तास चालायचं आणि उर्वरित वेळ ब्रेक्समध्ये जायचा.

Maharashtra TimesJason Sanjay : CM थलापती विजय यांच्या मुलाला त्यांच्याच चाहत्याने केलेलं किडनॅप, आईवडिलांच्या घटस्फोटादरम्यान जुना व्हिडिओ व्हायरल
अक्षय कुमारची ‘प्रॉफिट शेअरिंग’ डील आणि सेटवरील अवाढव्य व्यवस्था
चित्रपटाचे बजेट नियंत्रित राहण्यामागं मुख्य कारण म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. अक्षयनं या चित्रपटासाठी आगाऊ मानधन न घेता ‘प्रॉफिट शेअरिंग’ मॉडेलवर काम केलं आहे. यामुळे चित्रपटाचा निर्मिती खर्च मोठ्या प्रमाणावर वाचला.

सेटवरील काही थक्क करणाऱ्या गोष्टी
अक्षय कुमार सोडून इतर सर्व कलाकारांचं एकूण मानधन सुमारे ३५ कोटी रुपये होतं. तर मुख्य कलाकारांव्यतिरिक्त त्यांची स्वतःची टीम (एका स्टारसोबत साधारण ५ लोक) अशी १५० लोकांची फौज होती. तर दररोज सेटवर साधारण ७०० ते ९०० लोक उपस्थित असायचे.

५० हून अधिक व्हॅनिटी व्हॅन
एवढ्या मोठ्या संख्येनं येणाऱ्या कलाकारांसाठी दोन मोठे मैदान बुक करावे लागले होते, जेणेकरून तिथं ५० पेक्षा जास्त व्हॅनिटी व्हॅन्स पार्क करता येतील.

अहमद खान यांच्या मते, बजेट किती मोठं आहे यापेक्षा तुम्ही त्याचे व्यवस्थापन किती प्रभावीपणे करता, यावर चित्रपटाचं यश अवलंबून असतं. सध्या हा चित्रपट जगभरात १०० कोटींहून अधिक गल्ला जमवून बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करत आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा