प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या दापोली मध्ये ‘स्वच्छ व सुंदर दापोली’ हा उपक्रम पंचायत समितीकडून हाती घेण्यात आला आहे. दापोली तालुका पंचायत समिती सभापती उन्मेष राजे यांनी दापोली शहराकडे येणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरती प्लास्टिक निर्मूलन स्वच्छता मोहीम उपक्रम घेण्यात आला. या स्वच्छता मोहिमेला सगळ्या सामाजिक संघटना व नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
पर्यावरण दिनानिमित्ताने उपक्रम
ही स्वच्छता मोहीम उपक्रम 2 जून रोजी मंगळवारी दापोली तालुक्यात घेण्यात आला. 5 जून रोजी होणाऱ्या पर्यावरण दिनानिमित्ताने हा उपक्रम दापोलीत सुरू करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सभापती राजे यांनी दिली. कोकणातील दापोली तालुका हा पर्यटनासाठी महत्त्वाचा मानला जातो. दापोली तालुका पंचायत समितीकडून घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेच्या उपक्रमाची दखल थेट राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी स्वच्छता मोहीम उपक्रमाचे कौतुक केलं असून पंचायत समितीला स्वच्छतेसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा व यंत्र उपलब्ध करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ मदत करेल अशी ग्वाही दिली आहे. या स्वच्छता उपक्रमाच्या शुभारंभाला पंचायत समितीचे सभापती उन्मेष राजे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक उपसभापती सौ.नम्रता तोडणकर, नगराध्यक्ष कृपा घाग, कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य सुनील दळवी, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तालुक्यातील सरपंच, पर्यटन हॉटेल व्यवसायिक महासंघाचे मंगेश मोरे सचिन तोडणकर आदी उपस्थित होते.
MLC Election : जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे, अनिकेत तटकरेंचा मार्ग मोकळा
स्वच्छ व सुंदर दापोली हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू राहील तसेच प्लास्टिक मुक्त स्वच्छ दापोली असा संकल्प दापोली तालुका पंचायत समितीकडून करण्यात आला आहे. स्वच्छता मोहिमेत पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, संत निरंकारी मंडळ, महिला मंडळ, बचत गट, युवक मंडळ, छोटे व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, जेसीआय दापोली, लायन्स क्लब दापोली, रोटरी क्लब दापोली, ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, पत्रकार बंधू यांनी स्वच्छता मोहीम यशस्वी केली.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा