Headlines

सौरव गांगुली आणि पत्नी डोना यांना जीवे मारण्याची धमकी, महिनाभरापासून सुरु होता गंभीर प्रकार; पोलिसांत तक्रार दाखल


Sourav Ganguly Death Threat : भारतीय क्रिकेमध्ये दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीच्या पत्नीला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यानंतर आता पोलिसांची कारवाई सुरु झाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण?

Saurav Ganguly News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्यांची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची सातत्याने धमकी दिली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी आता तक्रार दाखल केली आहे. अलिकडेच सौरव आणि त्यांच्या पत्नी यांनी पोलिसांत याबद्दल औपचारिक तक्रार दिली आहे. सौरव यांच्या कार्यलयामध्ये दोन पत्र पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. या पत्रांमध्ये गांगुली दाम्पत्यासह त्यांच्या जवळच्या इतर लोकांनाही इजा पोहचवणार असल्याची थेट धमकी देण्यात आली आहे.

गांगुली परिवार टार्गेट

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार गेल्या महिनाभरापासून सौरव गांगुली यांनी अशा प्रकारचे आपत्तीजनक मजकूर लिहिलेले पत्र प्राप्त होत आहेत. सुरुवातीला या पत्रांकडे दुर्लक्ष करण्यात आलं. गांगुली यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार हे सर्व कोणीतरी हेटर्स करत असतील असा अंदाज होता, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं पण सोमवारी आलेल्या दोन पत्रांनंतर या प्रकरणाची गंभीरता वाढली. त्यानंतर पुढील घडामोड घडली.

Maharashtra TimesRohit Sharma : लॉर्ड्सवर ऐतिहासिक शतकानंतर हिटमॅनची नवी इनिंग! इन्स्टा व्हिडिओनं चाहत्यांमध्ये वाढली धाकधूक, रोहितच्या मनात नेमकं काय?

तक्रार दाखल

वाढत्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर गांगुली यांच्याकडून मंगळवारी दक्षिण कोलकाता येथील ठाकूरपुकुर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीत त्यांनी ही पत्रं पाठवणाऱ्याचे नाव अरुण असल्याचे सांगितले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही पत्रे उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बेलघरिया भागातून कुरिअरमार्फत पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाची तात्काळ दखल घेत कारवाईला सुरुवात करण्यात आळी आहे. तपास अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक कुरिअर एजेंसीच्या नेटवर्कवर लक्ष ठेऊन आहे. याव्यतिरिक्त, संशयिताशी संबंधित असलेल्या मोबाईल नंबर आणि सिम कार्डच्या लोकेशनचा शोध घेतला जात आहे. गेल्या काही महिन्यांत मिळालेली सर्व पत्रे एकाच व्यक्तीने पाठवली आहेत की यात एखाद्या टोळीचा सहभाग आहे, याचाही तपास अधिकारी करणार आहेत.

Maharashtra TimesIrfan Pathan : ‘तुझ्या आई-बापाने हेच शिकवलंय का?’; संगकारा इरफान पठाणवर का भडकला? 21 वर्षांनी वादाचं कारण समोर

अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

आरोपीला लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींवर काम करत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेबाबत आणि धमकीच्या पत्रांबाबत सौरव गांगुली किंवा त्यांच्या पत्नी डोना गांगुली यांच्याकडून अद्यापपर्यंत कोणतेही अधिकृत निवेदन किंवा माहिती जारी करण्यात आलेली नाही.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा