Headlines

सेवानिवृत्त शिक्षक सखाराम सावंत यांचे निधन


 

सावंतवाडी प्रतिनिधी : कलंबिस्त-कोळंबवाडी येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तथा हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे अध्यक्ष सखाराम (तात्या) विनायक सावंत (७२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

श्री. सावंत यांनी सावंतवाडी, दोडामार्ग आदी दुर्गम भागांतील विविध गावांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. शिक्षण क्षेत्राबरोबरच नाटक, संगीत, क्रीडा आदी विविध क्षेत्रांतही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. लहानपणापासूनच त्यांना नाटकातील विविध भूमिका साकारण्याची आवड होती.

प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी शिरशिंगे, गोटेवाडी, सांगेली, कुंब्रल, भेडशी आदी ठिकाणच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्य केले. तसेच कलंबिस्त येथील हनुमान दशावतार नाट्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून गेल्या एक दशकापासून ते कार्यरत होते. पंचक्रोशीत त्यांची ‘तात्या मास्तर’ म्हणून विशेष ओळख होती.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे तसेच अन्य असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर गुरुवार, सकाळी कलंबिस्त येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत व योगेश सावंत यांचे ते वडील होत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत