Headlines

सुमीत राघवनचा आतिष! अभिनेत्याने सांगितल्या दत्तक बिबट्यांच्या आठवणी, वर्षभराचा खर्च किती असतो माहितीये?| Maharashtra Times


Sumeet Raghvan Animal Love :अभिनेता सुमीत राघवन याचे प्राणी प्रेम सर्वांनाच माहित आहे. तो नेहमीच त्यांच्या अडल्या नडल्याला मदत करतो. त्याने दोन बिबटेही दत्तक घेतले होते.

SUMEET RAGHAVANA
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कलाकार आणि त्यांचे प्राणी प्रेम हे बरेचदा आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळते. लोकांना घरात पाळलेले प्राणी आवडतात पण हेच भटकी जनावर असली तर मात्र त्यांना हडतुड केले जाते. पण काही प्राणी प्रेमी मात्र त्यांची आवडीने काळजी घेतात. सिने इंडस्ट्री मधले कलाकार सुद्धा या भटक्या जनावरांसाठी प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळतात. बरेचदा हे लोक त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आवाज सुद्धा उठवतात. ते आजारी असतील किंवा त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च उचलतात. असाच एक अभिनेता म्हणजे सुमित राघवन.

अभिनेता सुमित राघवन यांनी एका मुलाखतीमध्ये त्याचे प्राण्यांवरील प्रेम व भविष्यात ठरवलेल्या काही योजना बद्दल माहिती दिली. तो म्हणाला की मला भविष्यात प्राण्यांसाठी शेल्टर सुरू करायचं आहे. त्यामध्ये फक्त कुत्रे मांजरीच नाही तर कबूतर चिमण्या हे सगळेच येतील. त्यांची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार? माणूस पार सेल्फिश आहे. तो फक्त स्वतःपुरता विचार करतो. आपण त्याबद्दल काही करू शकत नाही पण माझ्या गाडीत मी प्राण्यांसाठी नेहमी औषध खाणं ठेवतो. माझं काही ग्रुप सुद्धा आहेत जे सदैव मदतीला तयार असतात. मी स्वतः त्यांच्यासाठी खर्च करतो. मला त्यांच्यासाठी कोणाकडे पैसे मागायला आवडत नाही. किंबहुना मी काही प्रोजेक्ट सुद्धा असे करतो म्हणजे स्वतःकडे पैसे न घेता थेट तिथे प्राण्यांसाठी ते फिरवतो.

Maharashtra TimesIsha Keskar : मी आगाऊ वाटत असेल तर ती तुमची समस्या! इंडस्ट्रीतल्या मानधनाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोललेली ईशा केसकर
याच मुलाखतीमध्ये सुमीत राघवन ने सांगितलं की त्याने दोन बिबटे दत्तक घेतले होते. नॅशनल पार्क मध्ये एक कार्यक्रम राबवला आहे. जिथे तुम्ही वर्षभरासाठी प्राणी दत्तक घेऊ शकता. नगरच्या मळ्यात एकदा एक बिबट्या सापडला होता. त्याला मी दत्तक घेतलेलं. महिन्याला दहा हजार म्हणजे वर्षाला साधारण एक लाख वीस हजार रुपये त्यांना दिलेले. त्याच्या पिंजऱ्यावर सुमीत राघवन चा आतिश असं लिहिलेलं. आणखी एक तारा नावाची सुद्धा होती. ते तुम्हाला एक बॅच देतात तेव्हा तुम्ही कधीही जाऊन तुमच्या प्राण्याला पिंजऱ्यातून बघू शकता. तो बरा आहे की नाही, त्याची नीट काळजी घेतली जात आहे की नाही याची चौकशी करू शकता. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सुमीतने या गोष्टी सांगितल्या.


अभिनेता सुमीत राघवन बरेचद्या प्राण्याच्या मदतीला तत्पर धावून जातो. त्याचे असे अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहेत. ज्यात तो त्या मुक्या जीवांसाठी काही ना काही करताना दिसतो. ज्यांच्याकडे प्राणी आहेत पण त्यांच्याकडे फारसे पैसे नाहीत. अशांना सुद्धा तो मदत करतो. शिवाय त्याच्या मालिकांच्या सेटवर सुद्धा प्राणी असतील तर तो त्यांची काळजी घेतो. मालिका संपल्या तरी त्यांची जबाबदारी झिडकारत नाही. तो वेळो वेळी त्यांच्यासाठी पैसे पाठवून त्यांच्या खाण्या-पिण्याची, औषधाची सोय करतो. सेटवर काम करणारे लोक आवर्जुन सांगतात की या मांजरी किंवा कुत्रे सुमीत राघवन सरांच्या आहेत. ते अजूनही त्यांची काळजी घेतात.

Maharashtra TimesSanjay Jadhav On Daughter Boyfriend : तिच्या बॉयफ्रेण्ड्ससोबत मी तोंडावर चांगला वागतो, पण मला ते अजिबातच आवडत नाहीत, लेकीच्या अफेअर्सवर स्पष्टच बोलले संजय जाधव
सुमीत राघवनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याने वागळे की दुनिया, बडी दूर से आये है, सारा भाई व्हर्सेस सारा भाई, सजन रे झूठ मत बोलो या मालिकांमध्ये दिसलेला. या शिवाय त्याने संगीत मानअपमान, आपला माणूस, संदूक, बकेट लीस्ट, आणि डॉ. काशीनाथ घाणेकर, एकदा काय झाले, सहेला रे, होम स्वीट होम यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच महाभारत या मालिकेत त्याने सुदामा हे पात्र साकारले होते.