![]()
मुंबईतील सुप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कथित देणगी घोटाळ्याची आता सखोल चौकशी होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिराच्या दानपेटीतून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आणि विद्यमान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे थेट आदेश दिले आहेत. नेमकी चौकशी कशाची होणार? मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, आता सिद्धिविनायक मंदिरातील गेल्या पाच वर्षांतील देणगी आणि दान संकलनाची कसून चौकशी केली जाणार आहे. विशेषतः २०२३ ते २०२६ या कालावधीत देणगीच्या संकलनात जे अनपेक्षित चढ-उतार पाहायला मिळाले, त्या आर्थिक नोंदींची बारकाईने तपासणी केली जाईल. या संपूर्ण चौकशीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज ठाकरेंनी नेमका काय दावा केला होता? नुकतेच मनसे विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी तब्बल १८ कोटी रुपयांचे नुकसान होत आहे,” असा आरोप त्यांनी केला होता. सुरुवातीला मंदिर प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले होते, मात्र आता या प्रकरणाची थेट सरकारी पातळीवरून चौकशी सुरू झाली आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गट: राजकीय वाद पेटणार? या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. विद्यमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष (शिंदे गटाचे नेते) सदा सरवणकर आणि कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. या भेटीपूर्वी सरवणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. हेही वाचा.. तुमचं अजितदादांवर खरंच प्रेम होतं का?:सुनेत्रा वहिनींना मनसोक्त रडायलाही उसंत मिळाली नाही; राष्ट्रवादीतील कलहावर उमेश पाटलांची रोखठोक पोस्ट अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आणि धुसफूस आता उघडपणे चव्हाट्यावर येऊ लागली आहे. राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्यानंतर पक्षात वादाची ठिणगी पडली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी पोस्ट लिहिली आहे. “दादांच्या नावावर मोठे झालेले लोक आज त्यांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असे वातावरण निर्माण करत आहेत, यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का की ते केवळ सत्तेपुरतं होतं?” असा थेट आणि बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा
Source link
सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी अनियमिततेची चौकशी:मुख्यमंत्र्यांचे आदेश, राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण
