Mumbai 3.0: तिसऱ्या मुंबईच्या विकासाची जबाबदारी एमएमआरडीएला देण्यात आली असून आता सिंगापूर-स्थित कंपनीला या शहराचा आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रायगड: मुंबई आणि नवी मुंबईशेजारी तिसरी मुंबई उभारण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतूजवळ या प्रकल्पाचा विकास केला जात आहे. 324 चौरस किमी भूखंडावर हे शहर उभारणार आहे. सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहराच्या फेज 1साठी सिंगापूर-स्थित ‘सरबाना जुरॉन्ग इंफ्रास्टक्चर प्रा.लि.’ ही कंपनी आराखडा तयार करत आहेत.
कुठे असणार तिसरी मुंबई?
रायगड जिल्ह्यातील 124 गावांमध्ये हे शहर उभारणार आहेत. करनाळा-साई-चिरनर न्यू टॉऊन असं या तिसऱ्या मुंबईचं नाव असेल. जानेवारीमध्ये MMRDA आणि या सिंगापूर-स्थित कंपनीमध्ये एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये तिसऱ्या मुंबईच्या विकास आराखड्याचाही समावेश होता. गुरूवारी राज्य सरकारने या कपंनीला मास्टरप्लॅन तयार करण्यासाठी मंजुरी दिली आणि अधिकृत सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलं.
या विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 11.89 कोटी रुपयांचा खर्च होणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील टप्प्यासाठी नगरविकास विभागाच्या मंजुरीची गरज असेल. यामध्ये 23.12 कोटी रुपये निधीनुसार नियोजन केलं जाणार आहे. सध्या रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील 124 गावांमधील जमिनीचा कसा वापर केला जात आहे. याचा अभ्यास केला जाईल. त्यानुसार योजना तयार करण्यात येणार आहे.
कसा होणार विकास?
या परिसराच्या शेजारीत जेएनपीटी बंदर देखील आहे. त्यामुळे या परिसरातील काही भागाचा वापर गोदामांसाठी केला जातो. उर्वरित काही भाग शेतीसाठीही वापरला जातो. सध्या या जमिनींची भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर अभ्यास केला जाईल. एमएमआरडीएने ऑनलाइन प्रक्रियेद्वारे जमीनमालकांकडून संमती घेण्यास सुरूवात केली आहे. जमीनमालकांना भूसंपदान प्रक्रियेत भरपाईचे तीन मुख्य पर्याय देण्यात आले आहेत. सर्व प्रथम आर्थिक भरपाई किंवा एफएसआरआय /टीडीआर किंवा त्यांच्या जमीनीपैकी 22.5 विकसित जमीनीमध्ये भागीदारी असे तीन पर्याय देण्यात आले आहे.
नवी मुंबई विमानतळाजवळ तयार करण्यात येत असलेल्या ‘नैना’मधील 80 गावं तिसऱ्या मुंबईत येतात. तसचं खोपटा न्यू टाऊन परिसरातील 33 गावं, महामुंबईतील 2 आणि रायगड जिल्ह्यातील 9 गावांचा समावेश आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शिवाय प्रकल्पाचा आराखडा ऑगस्टपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा