Navi Mumbai to Abu Dhabi Flights: नवी मुंबई विमानतळावरून पहिली परदेशी सेवा एअर इंडिया एक्सप्रेसच्या नवी मुंबई ते अबू धाबी उड्डाणाने होणार आहे. १४ जुलैपासून आतंराराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: डिसेंबरमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात झाली. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षा होती. ती आज, मंगळवारी रात्री संपणार असून एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान नवी मुंबईहून अबू धाबीला जाण्यासाठी सज्ज झाले आहे. सुरुवातीला आठवड्यातून तीन विमाने अबू धाबीला उड्डाण करतील. त्यानंतर ही संख्या हळूहळू वाढवण्यात येईल.
कधी होणार सुरुवात?
नवी मुंबईहून बुधवारी उत्तररात्री २.५५ वाजता एअर इंडिया एक्स्प्रेसचे पहिले विमान अबू धाबीकडे रवाना होईल. सध्या या विमानतळावरून दररोज १५० विमानांची ये-जा होते. गेल्या २०० दिवसांमध्ये या विमानतळावरून २३ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे विमानतळाकडून सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवांचे अधिकृत अनावरण मंगळवारी संध्याकाळी करण्यात येणार आहे. नवी मुंबईहून अबूधाबीला जाण्यासाठी प्रवासीसंख्या हळूहळू वाढेल, असा अंदाज आहे. येत्या काळात या विमानतळावरून आणखी आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि अधिक विमान कंपन्यांची सेवा सुरू झाल्यानंतर प्रतिसाद आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
२५ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांची सुरुवात झाली. देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी मुंबईलगत दुसऱ्या विमानतळाचा विकास करण्यात आला. अबू धाबी मार्गासह एअर इंडिया एक्सप्रेस दिल्ली आणि बंगळुरूसाठीही देशांतर्गत सेवाही चालवण्यात येणार आहे. साप्ताहिक ३० उड्डाणे हाताळली जातील. मुंबई महानगर प्रदेशात हवाई प्रवाशांची संख्या वाढत आहे. यांना सामावून घेण्यासाठी हे विमानतळ महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
१५ जून २०२६ रोजी चीनमधील ग्वांगझो, जर्मनीमधील फ्रांकफर्ट आम माइन, कंबोडियातील कंदाल स्टुंग, अमेरिकेतली पिट्सबर्ग आणि अमेरिकेतली सॅन डिएगो या पाच आंतरराष्ट्रीय विमानतळांसह ‘प्रिक्स व्हसार्य’ जागातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत नवी मुंबई विमानतळाचा समावेश करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सेवा प्रवाशांसह मालवाहतुकीसाठीही सुरू होणार आहे. आठवड्याला जवळपास १८ मालवाहतूक उड्डाणे घेण्याचं विमानतळाचं उद्दिष्ट आहे. प्रवासी सेवांमध्ये पहिल्यांदा अबू धाबीपर्यंत जोडणी मिळणार आहे.
येत्या काही वर्षांमध्ये नवी मुंबई विमानतळावर प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमातळावर तिसऱ्या धावपट्टीसाठी तांत्रिक आणि व्यावसायिक व्यवहार्यता तपासायला सुरुवात केली आहे. एप्रिल महिन्यात सिडकोने हा निर्णय घेतला. त्यानंतर सहा महिन्यांच्या आत हा अभ्यास पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या विमानतळावर दोन धावपट्ट्या आणि चार टर्मिनलचा टप्प्या-टप्प्याने विकास होत आहे. पण भविष्यात वाढणारी मागणी लक्षात घेत विस्ताराचा विचार सुरू आहे. २०४० पर्यंत विमानतळावरील वार्षिक प्रवाशांची संख्या १५ कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तेच, २०४७-२०५० वार्षिक प्रवासी संख्या २४ कोटींपर्यंत पोहोचू शकते.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा