![]()
पाकिस्तान सध्या अत्यंत गंभीर संकटांनी घेरलेलाआहे. देशाची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडलीआहे. राजकीय अस्थिरता कायम आहे.बलुचिस्तानमध्ये बंडखोरी वाढत आहे. खैबरपख्तूनख्वामध्ये ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान”चे(टीटीपी) हल्ले वाढले आहेत, तर पाकव्याप्तकाश्मीरमध्येही लोकांचा असंतोष समोर येऊ लागलाआहे. मग पाकिस्तान आता फुटण्याच्या किंवा तुकडेहोण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे का? पाकिस्तानपुढील सर्वात मोठे खरे आव्हान त्याच्यासंघराज्य व्यवस्थेचे आहे. हा देश अनेक भाषा, वांशिकगट व प्रादेशिक अस्मितांनी मिळून बनला आहे. एवढ्या विविधतेने नटलेल्या समाजाला एका धाग्यात बांधण्याचे काम तिथल्या लोकशाही संस्थांपेक्षा सैन्यानेच जास्तकेले आहे. परंतु कोणत्याही देशाची एकतेसाठी जनतेचा विश्वास आणि राजकीय संमती आवश्यक असते.आज बलुचिस्तानमधील नागरिक आपल्या राजकीय हक्कांची मागणी करत आहेत. खैबर पख्तूनख्वा भाग दहशतवाद व लष्करी कारवायांमुळे अशांत आहे. सिंध प्रांतात वेळोवेळी प्रादेशिक अस्मितेचा प्रश्न वर डोकेकाढत असतो. दुसरीकडे मुहाजिर समाजही राजकीयप्रतिनिधित्वाबाबत असंतुष्ट आहे. आता पीओकेमध्येहीआर्थिक मुद्द्यांवरून सुरू झालेले जनआंदोलनशासनव्यवस्थेवर आणि इस्लामाबादच्या नियंत्रणावरथेट प्रश्न उपस्थित करू लागले आहे. यापैकी कोणताहीएक मुद्दा पाकिस्तानच्या अखंडतेला लगेचच धोकानिर्माण करू शकत नाही. पण संघराज्यीय रचनेत गंभीरभेगा पडल्याचे ते स्पष्ट संकेत असतात. असे असूनहीपाकिस्तान आजवर कसा काय टिकून आहे? याचेसर्वात मोठे कारण त्याची अंतर्गत ताकद नसून त्याचे‘रणनीतिक महत्त्व” हे आहे. पाकिस्तानचे भौगोलिकस्थान त्याला दक्षिण आशिया, मध्य आशिया, पश्चिमआशिया व आखाती देशांमधील एक महत्त्वाचा दुवाबनवते. त्याच्याकडे अणुवस्त्रे आहेत. सीमा अत्यंतसंवेदनशील क्षेत्रांशी जोडलेल्या आहेत. याचकारणामुळे जगातील महासत्तांना पाकिस्तानचा पूर्णविनाश किंवा पतन परवडणारे नाही. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानला आपलामित्र बनवले होते. अफगाण युद्ध आणि त्यानंतरदहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढ्यातहीपाकिस्तानची उपयोगिता कायम राहिली. आर्थिकसंकटात सापडलेला असतानाही आयएमएफसहअनेकआंतरराष्ट्रीय संस्थांनी त्याला वारंवार आर्थिक मदतकेली. पाकिस्तानला आतापर्यंत आयएमएफकडूनअनेक आर्थिक मदत पॅकेजेस मिळाली आहेत. हे निर्णयकेवळ आर्थिक नव्हते, तर त्यामागे भू-राजकीयकारणेही होती. आज चीन हा पाकिस्तानचा सर्वात मोठारणनीतिक भागीदार आहे. ‘चीन-पाकिस्तान आर्थिककॉरिडोअर” हा केवळ एक आर्थिक प्रकल्प नसूनचीनच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. बाहेरीलगुंतवणूक एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला तात्पुरताआधार देऊ शकते; त्या देशाची राष्ट्रीय एकता निर्माणकरू शकत नाही, हेही तितकेच सत्य आहे. अमेरिकेच्यागरजा आता बदलल्या आहेत. तरीही पाकिस्तान पूर्णपणेअस्थिर व्हावा असे अमेरिकेला वाटत नाही.अणुवस्त्रांची सुरक्षा, दहशतवाद व स्थिरता यांबाबतअमेरिकेला चिंता आहे. दुसरीकडे सौदी अरेबिया आणियूएईसारख्या आखाती देशांसाठीही पाकिस्तान एकमहत्त्वाचा सुरक्षा भागीदार राहिला आहे. वेगवेगळ्याकारणांमुळे अनेक देशांना पाकिस्तानमध्ये रस आहे. परंतु बाहेरील मदत ही पाकिस्तानच्या अंतर्गतसमस्यांवरचा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही.पाकिस्तानचे नेतृत्व नेहमीच आपल्या अंतर्गत अपयशांचेकायदे आणि दोष बाहेरील देशांवर—विशेषतः भारतावरढकलण्याचा प्रयत्न करते. यामुळे तिथल्या देशांतर्गतराजकारणात काही काळासाठी फायदा मिळू शकतो;परंतु प्रशासन, अर्थव्यवस्था आणि जनतेच्या मूळसमस्या सुटू शकत नाहीत. भारताच्या दृष्टीने सर्वातमहत्त्वाचे हे आहे की, त्याने पाकिस्तानच्याकमकुवतपणावर खूप उड्या मारू नयेत आणि त्यालाकमीही लेखू नये. एक अस्थिर पाकिस्तान भारतासाठीहीनवीन आव्हाने उभी करू शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) लष्कर आणि परदेशी मदतीच्या जोरावरचालण्याऐवजी पाकिस्तान नागरिकांच्याविश्वासावर उभा असलेला देश बनूशकेल का? याचे उत्तर मिळत नाहीतोपर्यंत त्याची अंतर्गत कमजोरी वरणनीतिक उपयोगिता—या दोन्ही गोष्टीकायम राहतील.
Source link
सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:अनेक देशांना पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे रस
