Headlines

सगुण- निर्गुण: तळटीप – ganesh mohite sagun nirgun special article on footnote


-डॉ. गणेश मोहिते

खरा तो एकचि धर्म , जगाला प्रेम अर्पावे… या भूमीतून किती नितांत सुंदर वैश्विक जगण्याची रीत सानेगुरुजींनी वर्णिली. परंतु प्रत्यक्षात ‘न कळे विंचासी कुरवाळीले अंग, आपले ते रंग दावितसे’ हा तुकोबांचा अनुभव आजच्या जीवनव्यवहारात सार्वत्रिक आहे. मनाने समृद्ध असणारी माणसे अवतीभवती दिसेनात. अनेकांचा आता चांगुलपणावर विश्वास नाही. उलट चांगुलपणा अंगी असणाऱ्याबाबत लोक साशंक, परंतु लबाडांच्या संगतीत अधिक रमतात. लोकांस स्वःअनुभूतीपेक्षा कथित, चर्चित, ऐकीव गोष्टींवरून इतरांच्या मोजमापाची सवय जडली. ही अशी माणसे सामाजिक व्यवहाराच्या सत्तास्थानी येता व्यवस्था विकलांग होत जाते. त्यांच्या अवाजवी हस्तक्षेपाने समाजस्वास्थ्य धोक्यात येते. अशा काळात सुसंस्कृत, संवादी, तत्त्वनिष्ठ माणसांना मूल्य नसते.

काय काशी करिती गंगा,
भीतरिं चांगा नाहीं तो…

मूलतः आपणच तत्त्वनिष्ठ जगण्याची ‘तळटीप’ स्पष्ट व्यापून असलो की हा दूषित समाजव्यवहार तितकासा आपल्याला बाधित करू शकत नाही; मात्र समूहच बाधित अवस्थेत असेल तर परिस्थिती जरा अवघड होते. अशावेळेस उपाय एकच – समाजव्यवहारील सात्विक मनोव्यापारात वाढ करीत जाणे. लिहित्या बोलत्या माणसांनी आपला ‘स्वर’ प्रखर करून नवी दृष्टी देणे. कारण आताशा समृद्ध मनाची माणसं कमी भेटतात.

निर्मोही, निरपेक्ष होता येणे हीच आज कसोटी नाही काय? स्वःच्या पुढे जावून, ‘जो जे वाछिंल, तो ते लाहो प्राणिजात’ असे माउलींप्रमाणे जनकल्याण मागणे, मानवजातीच्या हितार्थ स्वतःचा देह चंदनासारखा झिजवून निर्विकार होत जाणे आम्हांस जमायला हवे. आसक्तीत न रमता, अहंकार न कुरवाळता आपले संचित, ज्ञान इतरांना देत-घेत समृद्ध करण्याची धडपड करीत जाणे, वृथा प्रसिद्धीची बाधा न होता, पदाच्या मोहात न पडता, ज्ञानाचा अहंकार टाकून माणूस होण्याच्या जवळ जाता येणे. निर्मोही, निरपेक्ष होणे ही गोष्ट सोपी नाही; ती सोपी होवून माणसे समृद्ध होत जावीत. सामाजिक पर्यावरणातील प्रेम, सहिष्णुता वाढीस लागावी अन् सात्विकतेने आमुच्या जगण्याची अवघी ‘तळटीप’ व्यापून घ्यावी, यासाठीचा हा अट्टहास!

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत