Headlines

श्वेता तिवारी चक्क राज ठाकरेंना टॅग करत म्हणाली- मराठी माणसांनी असं वागलेलं चालतं का? नक्की काय घडलं?| Maharashtra Times


Shweta Tiwari Post : श्वेता तिवारीने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना एक सवाल केला आहे.

shweta tiwari
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी गेले काही दिवस सतत चर्चेत आहे, मध्यतरी तिच्या एक्स नवऱ्याने एक मुलाखत दिलेली ज्यात त्याने त्यांच्या संसाराबाबत बऱ्याच गोष्टी उघड केलेल्या. तेव्हापासून तिच्यावर चर्चा होत होती. नुकतचे तिने ऑनलाइन मागवलेल्या एका वस्तूमध्ये झुरळ आढळले. तिने या प्रकरणाबाबत एफडीए प्रमुख तुकाराम मुंडे यांना टॅग केले आणि कारवाईची मागणी केली. त्यानंतर, काही मराठी व्यक्ती आणि राज ठाकरे यांच्या समर्थकांकडून इन्स्टाग्रामवर आपल्याला शिवीगाळ करणारे आणि आक्षेपार्ह मेसेज मिळाल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे. तिने सोशल मीडियावर काही पोस्ट, स्क्रिन शॉर्ट शेअर केले आहेत. आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना प्रश्न विचारले आहे.

हे लोक सुशिक्षित आहेत आणि चांगल्या कुटुंबातील आहेत…

shweta tiwari post 2

श्वेताने या मेसेजचे स्क्रीनशॉट्स आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केले. तसेच, ज्या युजर्सनी हे मेसेज तिला पाठवले होते, त्यांची प्रोफाइल्सही तिने दाखवली. इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये तिने लिहिले, “सोशल मीडियावर महिलांना शिवीगाळ करणे ही अत्यंत चिंताजनक आणि दुर्दैवी बाब आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, असे कृत्य करणारे लोक काही अशिक्षित किंवा गरीब पार्श्वभूमीचे असतातच असे नाही. त्यातील अनेकजण सुशिक्षित आहेत आणि चांगल्या कुटुंबातील आहेत सुजन्य आहे. त्यांच्या घरी पत्नी, आई, मुलगी आणि बहीण असतानाही, इतर महिलांबद्दल अत्यंत अपमानास्पद भाषा वापरताना त्यांना अजिबात संकोच वाटत नाही.”

Maharashtra TimesPushkar Jog : मुंबई मराठी माणसाच्याच बापाची, माज दादागिरी तुमच्या राज्यात! अमराठी रिक्षाचालकांच्या उद्धटपणावर पुष्कर जोग व्यक्त

हे लोक आपल्या कुटुंबीयांना कसे सामोरे जातात?

एका दुसऱ्या पोस्टमध्ये श्वेताने लिहिले आहे, “एखाद्या महिलेशी अशा प्रकारे बोलल्यानंतर असे लोक आपल्या कुटुंबीयांना कसे सामोरे जात असतील, याचे मला आश्चर्य वाटते. यातील एक व्यक्ती राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा समर्थक असल्याचा दावा करणारा आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रात घालवले आहे; माझ्या वडीलही मुंबईतच लहानाचे मोठे झाले. ‘मराठी माणूस’ असण्याशी निगडित अभिमान आणि प्रतिष्ठा मी नेहमीच अनुभवली आहे. मराठी संस्कृती महिलांचा, तसेच त्यांच्या सामर्थ्याचा आणि प्रतिष्ठेचा आदर करते, या भावनेतूनच मी मोठी झाले आहे.”

Maharashtra TimesFarhana Bhatt Casting Couch : सिनेमाच्या आमिषाने मुंबईला बोलावलं पण कॉण्ट्रॅक्टमधल्या अटी वाचून बसला धक्का, दिग्दर्शकाचा वाईट हेतू समजताच फरहाना भट्टने काढला पळ

श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना प्रश्न

shweta tiwari post 1

त्यानंतर, राज ठाकरे यांना टॅग करत अभिनेत्री श्वेता तिवारीने विचारले की, जर हे लोक खरोखरच त्यांचे समर्थक असतील, तर त्यांना असे वर्तन मान्य आहे का? श्वेता म्हणाली, “केवळ मराठी बोलणे, स्वतःला ‘मराठी माणूस’ म्हणवून घेणे किंवा महाराष्ट्रावर प्रेम असल्याचा दावा करणे पुरेसे नाही. एखाद्या महिलेची ओळख तुम्हाला नाही, म्हणून तिचा सन्मान कमी होत नाही. एखाद्या गोष्टीशी तुमचे मतभेद असतील, ती गोष्ट तुम्हाला आवडली नसेल किंवा तुम्हाला कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार आहे असे वाटत असेल, तरीही महिलेशी असभ्य भाषेत बोलणे योग्य नाही. महिलांचा आदर करा, केवळ तुमच्या प्रिय महिलांचाच नाही, तर प्रत्येक महिलेचा आदर करा…. बस, एवढंच.”

‘द ट्रेटर्स २’ मध्ये श्वेता तिवारी

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, श्वेता तिवारी सध्या ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील ‘द ट्रेटर्स’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वात झळकत आहे. या शोमधील तिची खेळण्याची रणनीती आणि स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांना खूप आवडत आहे. करण जोहर या शोचे सूत्रसंचालन करत आहे. श्वेता तिवारीने आजवर अनेक वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तिने सलमान खानचा शो बिग बॉसही जिंकला होता.