Headlines

श्रीलंकेविरूद्धच्या कसोटीत बुमराहची जागा कोण भरून काढणार? गंंभीरकडे 2 पर्याय, पाहा कोण?


IND vs SL Test Playing 11 News : भारत आणि श्रीलंकेमधील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून सुरूवात होत आहे. या सामन्यामध्ये बुमराहची जागा कोण भरून काढणार याची सर्वांना उत्सकुता लागली आहे.

IND vs SL 1st Test News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका कसोटी सामन्याला उद्या म्हणजेच १५ ऑगस्टला सुरूवात होणार आहे. या सामन्यामध्ये गंभीर आणि शुभमन कोणावर विश्वास दाखवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारताचा हुकमी एक्का असलेला जसप्रीत बुमराह कसोटीमध्ये दुखापतीमुळे खेळणार नाही. त्यामुळे त्याची जागा कोण भरून काढणार? टीम मॅनेजमेंटकडे दोन पर्याय असून कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच भारतीय संघासमोर आणखी काय आव्हानं असणार आहेत हे सविस्तर जाणून घ्या.

प्रसिद्ध कृष्णा की ब्रार ?

जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज असेल, त्याच्या जोडोला गुरनूर ब्रार किंवा प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी एकाची निवड केली जाऊ शकते. मॉर्केल म्हणाले, ‘प्रसिद्ध आणि ब्रार हे दोघेही कसोटीतील आव्हानासाठी तयार आहेत. येथील उष्ण आणि दमट वातावरणाला सामोरे जाणे हे खरे आव्हान असेल. अर्थात, त्यांना भारतातील प्रतिकूल वातावरणात गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. त्यांनी या मालिकेसाठी चांगली पूर्वतयारी केली आहे,’ असा विश्वास मॉर्केल यांनी व्यक्त केला.

Maharashtra TimesIND vs SL 1st Test : भारत वि. श्रीलंका पहिला कसोटी सामना उद्या किती वाजता, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

आव्हान कुकाबुरा चेंडूचे

भारतीय संघाला एसजी चेंडूंची सवय आहे, तर श्रीलंकेत कुकाबुरा चेंडूंचा वापर केला जातो. कुकाबुरा चेंडूवरील सीम एसजी चेंडूंच्या तुलनेत अधिक वेगाने कमी होते. अन्य देशांच्या तुलनेत श्रीलंकेत कुकाबुरा चेंडूचा टणकपणा लवकर कमी होतो. गॉल येथील परिस्थिती लक्षात घेता, कुकाबुराच्या नव्या चेंडूंचा सामना करणे जुन्या चेंडूच्या तुलनेत अधिक अवघड ठरू शकते. श्रीलंकेतील कसोटीत वेगवान गोलंदाज प्रामुख्याने धावा रोखण्याचे काम करतात, तर विकेट मिळविण्याची जबाबदारी फिरकी गोलंदाजांवर अधिक असते. या मैदानावर गुड लेंथवर चेंडू टाकल्यास विकेट मिळण्याची शक्यता अधिक असते. चेंडू जुना झाल्यानंतर त्याचा टणकपणा कमी होतो. अशा वेळी आखूड टप्प्याच्या चेंडूंचा आणि क्रीझचा योग्य वापर महत्त्वाचा ठरतो.

Maharashtra TimesBAN vs AUS Test : पहिल्याच दिवशी तोफखाना घेत उतरलेली ऑस्ट्रेलिया बांगलादेशविरूद्ध बॅकफूटवर पण भारताचं टेन्शन का वाढलं? जाणून घ्या

वातावरणाचाही प्रभाव

गॉल हे समुद्रकिनारी वसलेले शहर असून, येथील स्टेडियम समुद्राच्या अगदी जवळ आहे. समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे खेळपट्टी लवकर कोरडी होते. सामन्याच्या अंतिम टप्प्यात रिव्हर्स स्विंग निर्णायक ठरू शकतो. गुरुवारी सकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे मैदानाचा टणकपणा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिव्हर्स स्विंगवरही परिणाम होऊ शकतो. येथील एकंदर परिस्थिती पाहता, कसोटीच्या उत्तराधांत चेंडू कमी-जास्त उसळण्याचाही धोका आहे.

Maharashtra TimesIND vs SL Test : भारत-श्रीलंका कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी, अज्जू नव्या इनिंगसाठी सज्ज; जाणून घ्या
श्रीलंकेविरूद्धच्या क्रिकेटसाठी भारतीय संघ :– शुभमन गिल (C), केएल राहुल (VC), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल (WK), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, अकिब नबी, सरफराज खान.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा