Headlines

श्रीलंकेच्या पहिल्या डावात सर्वबाद 290 धावा:भारताने दिला फॉलोऑन; दुसऱ्या डावातही 1 विकेट, सिराजने उदाराला केले बाद




कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेने सर्वबाद 290 धावा केल्या आहेत. 213 धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारताने श्रीलंकेवर ‘फॉलो-ऑन’ लादला आहे. भारताने आपला पहिला डाव 503/9 या धावसंख्येवर घोषित केला होता. भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर श्रीलंकेच्या सोनल दिनुशाने 103 धावांची शानदार शतकी खेळी केली. दोन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. आज सामन्याचा चौथा दिवस असून सध्या पहिल्या सत्रातील खेळ सुरू आहे. श्रीलंकेचा दुसरा डाव सुरू झाला असून संघाने एका गड्याच्या मोबदल्यात 43 धावा केल्या आहेत. सामन्याचे स्कोअरकार्ड



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत