Headlines

विशाल परब यांच्या माध्यमातून माजगाव हायस्कूल येथे शैक्षणिक साहित्य वितरण!


ओटवणे प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. प्रशालेला शैक्षणिक साहित्य वितरण केल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चौरे यांनी आभार मानले.
यावेळी विशाल परब यांचे माजगाव परिसरातील खंदे समर्थक उदय माडखोलकर यांनी विशाल परब यांच्या कार्याचे कौतुक करताना विशाल परब यांनी समाजातील सर्व घटकांसाठी कार्य केल्याचे सांगितले. तसेच यापुढेही ते आपल्या सामाजिक कार्याचा वसा पुढे सुरू ठेवणार असून त्यांच्यासारख्या युवा नेत्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी माजगाव येथील ओके कार्यकर्ते विठ्ठल उर्फ तातू सावंत, लक्ष्मण पंडित, मोहन सावंत, माजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चौरे व इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत