छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन घर घेण्यासाठी विवाहितेला माहेरुन 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आला. यासाठी महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : नवीन घर घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावत विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून घरात डांबून ठेवले. पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी देत तिला अंगावरील कपड्यांनिशी घराबाहेर हाकलून दिले. ही घटना मुंबईतील घाटकोपर पश्चिम भागातील रमाबाईनगर येथे घडली. या प्रकरणी विवाहितेचा छळ करुन तिला घराबाहेर हाकलून लावणाऱ्या पती राहुल मच्छिद्र अंभोरे (३२), सासू ललिता अंभोरे (५०), दीर रोहित अंभोरे (२८), अक्षय अंभोरे (२६), मामेसासरे नंदू रंगनाथ गायकवाड (४५), आजेसासरे रंगनाथ गायकवाड (७०), आजीसासू सुमनबाई गायकवाड (६५) आणि चुलत सासू सुनीता गायकवाड (४२, सर्व रा. रमाबाईनगर, घाटकोपर पश्चिम, मुंबई) यांच्या विरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात २५ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, २५ मार्च २०२४ ते १ मे २०२५ या कालावधीत आरोपींनी नवीन घर घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यात आली. तसेच घरात कोंडून ठेवून पैसे न आणल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर फिर्यादीला अंगावरील कपड्यांनिशी घराबाहेर हाकलून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार राठोड करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेच्या हातातील मोबाईलदुचाकीस्वार चोरट्यांनी पळवला
छत्रपती संभाजीनगरमध्ये ही एक घटना ताजी असताना आता मोबाईल चोरीची दुसरी घटना समोर आली आहे. पतीसोबत दवाखान्यातून घरी जात असलेल्या महिलेच्या हातातील मोबाइल हा दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (२१ ऑगस्ट) पुंडलिकनगर परिसरात घडला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात मनकर्णाबाई प्रल्हाद घुगे (वय ४४, रा. शिवशाहीनगर) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी या पतीसोबत दवाखान्यातून घरी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील १२ हजार रुपये किंमतीचा मोबाइल हिसकावला. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून पसार झाले. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार मान्टे करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून ठेकेदारास मारहाण
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक विचित्र घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने बांधकाम ठेकेदाराला काठीने मारहाण करून त्याच्या खिशातील २ हजार ७०० रुपये बळजबरीने काढून घेतल्याचा प्रकार शुक्रवारी (२१ ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास देवळाई चौकातील पुलाखाली घडला. मिथुन राठोड (३५, रा. खडोरोड) व त्याचे तीन साथीदार, अशी मारहाण करून ठेकेदाराला लुटणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सिदार्थ शंकर कांबळे (४९, रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, फिर्यादी हा बांधकाम ठेकेदार असून, २१ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तो कामावरून घरी जात होता. देवळाई चौक पुलाखाली त्याला ओळखीचा मिथुन राठोड भेटला. त्याने फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.
फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने राठोडने शिवीगाळ करत लाकडी काठीने फिर्यादीला जबर मारहाण केली. यानंतर राठोडच्या तीन साथीदारांनी फिर्यादीच्या खिशातील दोन हजार ७०० रुपये बळजबरीने काढून घेतले आणि चौघेही तेथून निघून गेले. जखमी फिर्यादीने सातारा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा