मुंबई : पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने यजमाना भारत आणि झिम्बाब्वे संघावर सात विकेटने मात केली. भारताचा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेनंतर पहिला विजय ठरला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडची मालिका गमावल्याने भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्याचं पाहायला मिळालं होत. झिम्बाब्वेला त्यांच्या घरच्या मैदानावर सहज मात देत कॅप्टन श्रेयस अय्यर याने आपल्या विजयाचा श्रीगणेशा केला आहे. सलग सात सामन्यात एकही विजय श्रेयसला मिळवता आला नव्हता. अखेर विजयाचा दुष्काळ संपवत भारतीय संघाने कात टाकली आहे.
आजच्या सामन्यामध्ये श्रेयसने सलग आठवा टॉस जिंकत बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. यादव बंधूंनी हा निर्णय खऱ्या अर्थाने योग्य ठरवत भारताला सामन्यावर पकड मिळवून दिली. या सामन्यामध्ये झिम्बाब्वे संघ प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये १२५-७ धावा करू शकला. यजमान संघाकडून वेस्ली माधेवेरेने ३९ धावा, ताडिवनाशे मरुमानीने नाबाद २७ धावा आणि रेयान बर्लने २६ धावा केल्या. कॅप्टन सिकंदर रझा याला शिवम दुबे याने माघारी धाडले, त्यामुळे त्यांना डावाला सांभाळण्यााठी कोणताही भरवशाचा खेळाडू राहिल नाही. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दडपण ठेवले. मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी २-२ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
झिम्बाब्वे संघाच्या १२६ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा (१ धाव) हा लवकर माघारी परतला. मात्र वैभवने त्याचा शो झिम्बाब्वेला दाखवत दांडपट्टा चालवला. वैभव खेळत असताना त्याने स्ट्राईक देण्यावर सोबतच्या खेळाडूंनी भर दिला. त्यानेही या संधीचे सोने करत १८ चेंडूत ५० धावा केल्या आणि त्यानंतर लगेच आऊट झाला. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले.
दरम्यान, भारतीय संघाने १३ ओव्हरमध्ये १२६ धावांचे आव्हान पूर्ण केले. ४० चेंडू राखून ठेवत भारतीय संघाने हा विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये १७ डॉट बॉल टाकणाऱ्या मयंक अग्रवाल याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. तर भारताचा दुसरा टी-२० सामना २५ जुलैला होणार आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा