याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी त्याला जखमी अवस्थेत पोलिसांकडे खेटे घालावे, तरीही पोलिस दाद देईनात म्हटल्यावर खुद्द राहुल गांधींनी पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. त्यांनाही यंत्रणांनी आधी ‘वरून आदेश आहेत,’ म्हणत दाद दिली नाहीच, अखेर सहा तासांच्या आंदोलनानंतर पोलिस यंत्रणा एकदाची हलली आणि गुन्हा दाखल झाला.
दिल्ली विद्यार्थी आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
कायद्याचे रक्षक म्हणवणारी यंत्रणा सामान्य माणसाला आधार देण्याऐवजी रडकुंडीला कशी आणू शकते, याचे अनुभव सामान्य माणसे रोजच घेत असतात. पोलिस ठाण्याची पायरी चढायची वेळच येऊ नये असे लोक म्हणतात, ते उगाच नाही. याचा अनुभव खुद्द देशाच्या विरोधी पक्षनेत्याला आला. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी २० जुलै रोजी दिल्लीत झालेल्या आंदोलनात विद्यार्थी आंदोलकांवर तुफान लाठीमार आणि पेलेट गनमधून अंदाधुंद मारा करण्यात आला. त्यात १९ वर्षांचा साहिल लोचाब गंभीर जखमी झाला होता.
याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी त्याला जखमी अवस्थेत पोलिसांकडे खेटे घालावे, तरीही पोलिस दाद देईनात म्हटल्यावर खुद्द राहुल गांधींनी पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. त्यांनाही यंत्रणांनी आधी ‘वरून आदेश आहेत,’ म्हणत दाद दिली नाहीच, अखेर सहा तासांच्या आंदोलनानंतर पोलिस यंत्रणा एकदाची हलली आणि गुन्हा दाखल झाला. आता तो गुन्हे शाखेकडे जाईल, तपास होईल आणि मग आपल्या न्यायव्यवस्थेच्या वेगानुसार त्याला न्याय मिळालाच, तर तोवर कदाचित त्याचे शिक्षणही संपलेले असेल. साहिलला केवळ पोलिसांनीच अडवले असे नव्हे, तर त्याआधी त्याला आवश्यक ते वैद्यकीय प्रमाणपत्रही वेळेत दिले गेले नाही. त्याच्यावर तीन वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार झाले. अंगभर पेलेटचे तुकडे आणि डोळ्यांवर पट्टी बांधून त्याला प्रमाणपत्रासाठी धावाधाव करावी लागली.
दोन शस्त्रक्रिया होऊनही त्याला एका डोळ्याने दिसत नाही, दुसऱ्या डोळ्याची नजरही कमकुवत झाली आहे. १४ ते २१ ऑगस्ट असा आठवडाभर साहिल आणि त्याचे कुटुंबीय एफआयआर नोंदवण्यासाठी विविध पोलिस ठाण्यांमध्ये चकरा मारत होते. अखेर २१ ऑगस्टला राहुल गांधी यांनी साहिल आणि त्याच्या आईसोबत ठिय्या आंदोलन केले, तेव्हा कुठे दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला. कोवळ्या विद्यार्थ्यांवर पेलेट डागणाऱ्या आपल्या व्यवसायबंधूंना वाचवण्यासाठी केलेला पोलिसांचा हा आटापिटा साऱ्या देशाने पाहिला. देशाचा विरोधी पक्षनेता सोबत असतानाही सरकारी यंत्रणा सामान्य माणसाला किती जेरीस आणू शकतात, याचे हे उदाहरण. सामान्य नागरिक सरकारी कार्यालयांत असे अनुभव रोजच घेत असतात; पण प्रश्न कायदा आणि सुरक्षेचा असतो, तेव्हा यंत्रणांनी थोडे संवेदनशील व्हावे अशी अपेक्षा असते. वर्दीच्या गुर्मीत नेमकी तीच हरवून जाते तेव्हा माणसाचा वर्दीवरचा विश्वास उडतो. कायद्याच्या रक्षकांनी हे ध्यानात घेतलेले बरे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा