Cristiano Ronaldo Marriage News : फुटबॉल जगतातील महानायक ख्रिस्तियानो रोनाल्डो याने त्याची दीर्घकालीन पार्टनर जॉर्जिना रोड्रिगेज हिच्यासोबत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑगस्ट रोजी हा विवाहसोहळा पार पडला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : फुटबॉल विश्वातील महानायक ख्रिस्तियानो रोनाल्डो याने मैदानाबाहेर आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांना एक खूप मोठे सरप्राईज दिले आहे. पोर्तुगालच्या या दिग्गज फुटबॉलपटूने त्याची दीर्घकाळापासूनची पार्टनर जॉर्जिना रोड्रिगेज हिच्यासोबत ११ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. होय, ही घडामोड समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. रोनाल्डोने स्वतः जॉर्जिनासोबतचा एक अतिशय सुंदर फोटो शेअर करून त्यांच्या विवाहाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून आपापल्या वेडिंग रिंग्ज दाखवताना दिसत आहेत.
कसा पार पडला विवाहसोहळा?
मिळालेल्या माहितीनुसार, रोनाल्डो जॉर्जिनाचा हा विवाहसोहळा पोर्तुगालची राजधानी लिस्बनजवळील कासकैश या निसर्गरम्य किनारपट्टीवरील शहरात पार पडला. हा सोहळा अत्यंत खाजगी आणि कौटुंबिक होता. कोणत्याही मोठ्या थाटामाटाशिवाय आणि पाहुण्यांच्या गर्दीशिवाय केवळ रोनाल्डो, जॉर्जिना आणि त्यांची पाच मुले या विवाहाला उपस्थित होती. त्यांच्या पाच मुलांची नावे ख्रिस्तियानो ज्युनियर, इवा व मातेओ, (जुळी) अलाना मार्तिना आणि बेला एस्मेराल्डा अशी आहेत.
२०१६ मध्ये झाली प्रेमकहाणीची सुरुवात
दरम्यान, रोनाल्डो आणि जॉर्जिना यांच्या नात्याची सुरुवात जवळपास एका दशकापूर्वी २०१६ मध्ये स्पेनची राजधानी माद्रिद येथे झाली. त्यावेळी रोनाल्डो रियल माद्रिद क्लबकडून खेळत होता आणि जॉर्जिना गुच्चीच्या (Gucci) एका बुटीकमध्ये सेल्स असिस्टंट म्हणून काम करायची. पहिल्या भेटीच्या काही दिवसांनंतर एका ब्रँड इव्हेंटमध्ये दोघांची पुन्हा भेट झाली आणि तिथून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. स्पेनमधून सुरू झालेला हा प्रवास इटली, इंग्लंड आणि आता सौदी अरेबियापर्यंत पोहोचला असून तो एका अतिशय सुंदर आणि कुटुंबापर्यंत येऊन पोहोचला आहे.
नोव्हेंबर २०१७ मध्ये जॉर्जिनाने तिची पहिली मुलगी अलाना मार्तिनाला जन्म दिला. मात्र, त्याआधी काही महिने सरोगसीद्वारे जन्मलेली जुळी मुले (मातेओ आणि इवा) आणि रोनाल्डोचा मोठा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर यांनाही जॉर्जिनाने नेहमी तिच्या सख्ख्या मुलांप्रमाणेच वाढवले आहे. रोनाल्डो आणि जॉर्जिना नेहमीच एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहिलेले पाहायला मिळाले आहेत.
रोनाल्डोचा फुटबॉलमधील दबदबा कायम
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये १४६ गोल नोंदवणारा आणि ५ वेळा बॅलन डी’ओर (Ballon d’Or) पुरस्कारावर नाव कोरणारा ४१ वर्षीय रोनाल्डोअलीकडेच आपल्या विक्रमी सहाव्या विश्वचषकात पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करताना दिसला. जरी तो विश्वचषक पोर्तुगालसाठी फारसा खास ठरला नसला, तरी रोनाल्डोची जादू कायम आहे. सध्या रोनाल्डो सौदी प्रो लीगमधील ‘अल-नासर’ क्लबकडून खेळत असून, तो या नवीन देशांतर्गत हंगामातही मैदानात उतरणार आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा