गवताने निर्मित पादत्राणं पाहून पुरातत्व तज्ञही अवाक्
स्पेनमध्ये पुरातत्व तज्ञांच्या एका टीमला मोठा खजिना मिळाला आहे. त्यांना कचरा आणि राखेच्या ढिगात 2 हजार वर्षे जुन्या गवताने निर्मित पादत्राणं मिळाली आहेत. हा शोध उरियम नावाच्या एका प्राचीन खाणीनजीक लागला आहे. उरियम स्पेनच्या सेविलपासून सुमारे 55 मैल अंतरावर स्थित आहे. हे ठिकाण रोमन साम्राज्य येण्याच्या पूर्वी आयर्न एजच्या काळातील आहे. संशोधकांना उत्खननादरम्यान आठ पादत्राणांचे तुकडे मिळाले आहेत. इतकी वर्षे राखेत दाबून राहिल्यामुळे ही पादत्राणं अत्यंत सुरक्षित आहेत.
या पादत्राणांच्या मदतीने आयबेरियन पेनिनसुलाच्या लोकांच्या जीवनाची अनेक रहस्यं समोर आली आहेत. ही पादत्राणं त्या काळातील कामगार कशाप्रकारच्या गोष्टी वापरत होते हे दाखवून देतात. यामुळे प्राचीन काळाचे राहणीमान समजून घेण्यास मोठी मदत होणार आहे. हा शोध त्या काळातील लोकांची मेहनत आणि त्यांच्या दैनंदिन संघर्षाची कहाणीही सांगतो.
या शोधाविषयी पिरने नियतकालिकात एक अध्ययन प्रकाशित झाले आहे. पुरातत्वतज्ञांना ही पादत्राणं फर्स्ट सेंच्युरी बीसीईच्या एका मेटल वर्कशॉपनजीक मिळाली आहेत. या ठिकाणी 4 वेगवेगळे वर्क एरिया आणि 10 भट्ट्या होत्या. याचबरोबर 16 आणखी खोल्या मिळाल्या असून त्यांचा कशासाठी वापर केला जात होता हे अद्याप कळू शकलेले नाही. टीमला ही पादत्राणं थेट वर्कशॉपमध्ये मिळालेली नाहीत. ही पादत्राणं नजीकच्या एका अंगणात राखेच्या ढिगात फेकण्यात आली होती.
येथे भट्टीतील कचरा आणि दैनंदिन वापराच्या इतर गोष्टीही विखुरलेल्या मिळाल्या आहेत. यातून हे ठिकाण कचरा फेकण्यासाठी वापरले जात होते हे स्पष्ट होते. पादत्राणांची अवस्था पाहून ती मोठ्या वापरानंतर तुटली होती असे कळते. जुन्या आणि खराब झाल्याने मजुरांनीच पादत्राणं कचऱ्यात फेकली होती.
गवताने तयार क्हायची पादत्राणं
-या पादत्राणांना एस्पोर्टो नावाच्या अत्यंत मजबूत गवताने तयार करण्यात आले होते. या गवताला अधिक मुलायम न करताच वापरले जात होते.
-पादत्राणं निर्माण करणारे कारागिर गवताला पातळ आणि चपट्या वेणीप्रमाणे विणत होते. यानंतर त्यांना सोलचा आकार दिला जात होता.
-पादत्राणांचे वजन सहन करणाऱ्या हिस्स्याला मोठ्या धाग्यांनी तयार करण्यात आले होते. तेथेच त्यांच्या जॉइंट्सला लवचिक धाग्यांनी बांधले गेले होते.
-प्रत्येक सोलची लांबी सुमारे 6.7 ते 9.8 इंचादरम्यान आहे. यातील कमीतकमी चार पादत्राणं डाव्या पायांची आहेत.
-वापरामुळे त्यांचा समोरील हिस्स्या खूपच घासला गेला होता. यातून मजुरांनी दीर्घकाळापर्यंत पादत्राणं वापरली होती हे कळते.
कार्बन डेटिंगमुळे रहस्याची उकल
पादत्राणांचे वय जाणून संशोधकही अत्यंत थक्क झाले आहेत. रेडिओकार्बन डेटिंगद्वारे एक सोल 28 ते 124 सीईदरम्यानचा असल्याचे कळले. तर दुसरे चप्पल 360 ते 205 बीसीईदरम्यान लेट आयर्न एजचे आहे. एका तिसऱ्या चप्पलचा काळ 175 ते 56 बीसीईदरम्यानचा असल्याचे सांगण्यात आले. यातून उरियममध्ये स्रुमारे 500 वर्षांपर्यंत मजूर सातत्याने काम करत राहिल्याचे कळते. 19 बीसीईमध्ये रोमन्सच्या कब्जापूर्वीची ही पादत्राणं दशकांपर्यंत वापरली जात होती. रोपांपासून तयार केलेल्या गोष्टी सर्वसाधारणपणे लवकर खराब होत्या. परंतु राखेच्या ढिगात गाडली गेल्याने ही पादत्राणं शतकांपर्यंत सुरक्षित राहिली आहेत. याच राखेत पुरातत्वतज्ञांना त्याच गवताने निर्मित दोरखंड अन् टोपल्या मिळाल्य आहेत.
