Headlines

याला काय अर्थ आहे! वैभव सूर्यवंशीला आजही खेळवणार नाहीत, मॅचआधी कॅप्टन अय्यर काय म्हणाला?


Shreyas Iyer News : भारत आणि इंग्लंडमधील पहिला सामना आज रात्री दहा वाजता सुरू होणार आहे. टी-२० सामन्यात आजतरी वैभवला संधी द्यावी अशी चाहत्यांची इच्छा होती, पण पुन्हा एकदा त्यांची निराशाच होणार असे दिसत आहे. सामन्याआधी श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घ्या.

Vaibhav Sooryavanshi Shreyas Iyer
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. आता पार पडलेल्या आयर्लंडविरूद्धच्या मालिकेत भारताला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने मालिका गमवावी लागली होती. किमान आजच्या होणाऱ्या टी-२० सामन्यामध्ये भारताचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीला संधी द्यावी अशी सर्व चाहत्यांची इच्छा आहे. मात्र चाहत्यांची निराशा होणार असल्याचं दिसत आहे. कारण कॅप्टन श्रेयस अय्यरने केलेल्या विधानाने ते जवळपास स्पष्ट झाले आहे.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

संघातील सर्व खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे. असं नाहीये एकच खेळाडू चांगला खेळतोय, सर्व खेळाडूंना संधी द्यायला हवी जेणेकरून आत्मविश्वास राहायला हवा. मागील वर्ल्ड कप जिंकलेल्या खेळाडूंना टी-२० मध्ये कसे प्रदर्शन करावे लागते याची माहिती आहे. कारण ते या फॉरमॅटमध्येभ भारताचे प्रमुख स्तंभ राहिले आहेत. कोणाला काहीच माहिती नाही की काय होणार आहे. आम्हालाही माहिती नाही आम्ही काय ठरवणार आहोत, कारण ही माहिती गोपनीय असते. आम्ही सर्वांनाच काय करणार आहोत याची माहिती देऊ शकत नाही, कारण विरोधी संघालाही याबद्दल समजू शकतं. वैभव सूर्यवंशी युवा खेळाडू असून त्याला संधी मिळेल तेव्हा तो नक्की चांगला खेळणार, असं श्रेयस अय्यर याने म्हटलं आहे.
Maharashtra TimesIND vs ENG 1st T20 : इंग्लंडविरूद्ध भारताचा आज पहिला टी-20 सामना, वैभव सूर्यवंशीला गंभीर-श्रेयस खेळवणार की नाही?

मी बातम्या पाहत नाही- अय्यर

वैभव सूर्यवंशी याला खेळण्याची संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे. मात्र यावर बोलताना, मी असं काही पाहिलं नाही, मला खरंच माहिती नाही. मी बातम्या पाहत नाही आणि सोशल मीडियापासून स्वत: ला दूर ठेवत असल्याची प्रतिक्रिया अय्यरने दिली. एकंदरित अय्यरचं हे बोलणं संभ्रमात टाकणार असून मॅनेजमेंट काय निर्णय घेणार हे समजत नाहीये. परंतु वैभवला खेळवण्यासाठी संघातील वरिष्ठ खेळाडूला तो बाहेर बसवणार नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.
Maharashtra TimesFIFA World Cup 2026 Tickets : फुटबॉल वर्ल्ड कप सामन्यांची तिकिटे आवाक्याबाहेर, सर्वात स्वस्त तिकीट 3 लाख रुपये
दरम्यान, आजचा सामना म्हणजे भारत वि. इंग्लंड पहिला टी२० रात्री १० वाजता सुरू होणार आहे. या सामन्यामध्ये रात्री साडे नऊ वाजता टॉस होईल. भारत आणि इंग्लंडमध्ये कोण विजयी सूरुवात करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु भारतीय प्रेक्षकांना हा सामना लाईव्ह पाहायचा असेल तर रात्रीचं जागं रहावं लागणार आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा