Headlines

मुख्यमंत्री महोदयांना टीका सहन होईना:तेव्हा मंदिरे उघडा म्हणणारे आज स्वतःच बंद करतायत, अंबादास दानवेंचा भाजपला टोला




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना काळातील एका जुन्या प्रसंगाची आठवण करून देत दानवे यांनी भाजपच्या बदलत्या भूमिकेवर कडाडून टीका केली. नियतीचा फेरा तर पहा, कोरोना काळात ‘मंदिरे उघडा’ म्हणून राज्यपालांचे उंबरठे झिजवणाऱ्यांवरच आज स्वतःहून मंदिरे आणि पर्यटनस्थळे बंद करण्याची वेळ आली आहे,अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या भीषण संकटकाळात जेव्हा संपूर्ण जग ठप्प झाले होते, तेव्हा याच भाजपच्या काही नेत्यांनी ‘मंदिरे उघडा’ अशी मागणी करणारी पत्रे तत्कालीन राज्यपालांना दिली होती. राज्यपालांच्या घराचे उंबरठे झिजवून त्यांनी मंदिरे उघडण्यासाठी प्रचंड आग्रह धरला होता आणि आंदोलने केली होती. आता निसर्गाची आणि वरुणराजाची चक्री अशी काही फिरली आहे की, त्याच मंडळींवर आज स्वतःहून मंदिरे, पर्यटनस्थळे आणि गावांमध्ये लोकांना ‘नो एन्ट्री’ घोषित करण्याची वेळ आली आहे. या बदललेल्या भूमिकेवरून आणि घेतलेल्या ‘यु-टर्न’वरून जर सत्ताधाऱ्यांवर टीका झाली, तर ती मुख्यमंत्री महोदयांना सहन होत नाही, असा टोलाही अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. भाजप खासदाराच्या ‘त्या’ सल्ल्याची करून दिली आठवण सत्ताधाऱ्यांच्या या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेताना दानवे यांनी भाजपच्याच एका खासदाराने संसदेत दिलेल्या जुन्या सल्ल्याची आठवण करून दिली. संसदेत विरोधकांना ‘सुनने की क्षमता रखीये’ असा सल्ला देणाऱ्या भाजप नेत्यांना आता स्वतःमध्ये ती क्षमता निर्माण करण्याची गरज आहे, असे दानवे म्हणाले. तसेच, मानवतेचा दृष्टिकोन आणि इतर विषयांचे धडे त्यांनी बाहेर देण्यापेक्षा आपल्याच पक्षाच्या नेत्यांना द्यावेत, कारण सध्या त्यांनाच त्याची सर्वात जास्त गरज आहे, असा सणसणीत टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या काही निर्णयांवरून दानवे यांनी हा राजकीय बाण सोडल्याचे दिसत आहे. हे ही वृत्त वाचा मिसिंग लिंकवरून विरोधकांना फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर:म्हणाले- मला बदनामा करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका; 13 हजार कोटींचा पूर नियंत्रण आराखडा मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अतिवृष्टी, पूरस्थिती, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर विधानसभेत नियम 293 अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा मांडला. यावेळी त्यांनी मुंबईत अवघ्या सहा दिवसांत पावसाळ्यातील सुमारे 42 टक्के पाऊस झाल्याचे सांगत हा अपवादात्मक पाऊस असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर मुंबईची तुंबई रोखण्यासाठी 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार केल्याची माहिती दिली. मिसिंग लिंक प्रकल्पावरील टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आघाडी सरकारने हा प्रकल्प अशक्य असल्याचे सांगून फाइल बंद केली होती, तर महायुती सरकारने तो प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवल्याचा दावा केला. वाचा सविस्तर



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत