Riteish Deshmukh Birthday post for Genelia:अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया हे सिनेइंडस्ट्रीतील एक पावर कपल म्हणून ओळखलं जातं. आज जिनिलियाचा वाढदिवस . रितेशनं त्याच्या बायकोसाठी एक खास बर्थडे पोस्ट शेअर केली आहे.

जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त तिचा पती आणि अभिनेता रितेश देशमुखनं सोशल मीडियावर एक अत्यंत प्रेमळ आणि गोड अशी पोस्ट शेअर केली आहे. बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक आवडत्या जोडप्यांपैकी एक असलेल्या या दोघांच्या या पोस्टनं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.रितेशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जिनिलियासोबतच्या खास क्षणांचे फोटो शेअर करत एक गोड असं कॅप्शनही लिहिलं आहे.
आपण एकत्र घालवलेल्या क्षणाबद्दल, आपल्या आयुष्यातील खास आठवणी याचा मी विचार करत होतो. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे मी एकचाच मोठा होतोय, माझं वय वाढतंय. पण तू अजूनही तशीच आहेस. पण नंतर पुन्हा एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे तू खरंच नशिबवान आहेस की, तुला माझ्या सारखा नवरा भेटला.
Pradeep Rawat: आयुष्यात चढ-उतार, पाच महिन्यात घटस्फोट, आरोप ठरलेले खोटे; प्रदीप रावत यांना साऊथ इंडस्ट्रीत न मागता मिळायचं तिप्पट मानधन
आमच्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी, सुपर मॉम आणि एक आदर्श मुलगी, बहीण आणि माझी वेडी बायको…तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! असं रितेशनं त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
रितेशच्या या रोमँटिक आणि कौटुंबिक पोस्टवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक सेलिब्रिटींसह हजारो चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि या जोडीच्या प्रेमाचं कौतुक केलं आहे.
महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी
तर अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया हे महाराष्ट्राचे लाडके ‘दादा आणि वहिनी’ म्हणून लोकप्रिय आहेत. मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय आणि आदर्श जोडप्यांमध्ये या दोघाचं नाव घेतलं जातं. कपल गोल्स असलेल्या या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीए.
तर वर्ष २००२ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या टेस्टसाठी दोघे पहिल्यांदा हैदराबाद विमानतळावर भेटले होते. रितेश महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आहेत, हे समजल्यावर जिनिलीयाला वाटलं होतं की रितेशमध्ये खूप अहंकार असेल. त्यामुळं तिनं सुरुवातीला रितेशकडं दुर्लक्ष केलं आणि काहीसा भाव खाल्ला. पण नंतर शूटिंगदरम्यान जेव्हा जिनिलियानं पाहिलं की रितेश अत्यंत नम्र, सुसंस्कृत आणि प्रत्येकाशी आदरानं वागणारा व्यक्ती आहे, तेव्हा तिचा हा गैरसमज दूर झाला आणि दोघांमध्ये छान मैत्री झाली.चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर दोघेही एकमेकांना मिस करू लागले. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. विशेष म्हणजे, तब्बल १० वर्षे (२००२ ते २०१२) दोघांनी आपलं नातं माध्यमांपासून आणि जगापासून पूर्णपणे लपवून ठेवलं होतं. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जिनिलियानं लग्न केलं. आता त्यांना दोन राहिल आणि रियान ही दोन मुलं आहेत.

