मुंबई:बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननच्या एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधन जाहिरातीवरून सुरू झालेला विवाद सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर आता या वादात प्रियांका चोप्राची आई डॉ. मधु चोप्रा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Kapuskonda Teaser : ‘नवरा माझा नवसाचा’नंतर 21 वर्षांनी सचिन पिळगावकर आणि मधुराणी प्रभुलकर शेअर करणार स्क्रिन, ‘कापूसकोंडा’ चा टीझर समोर मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी क्रितीचं नाव न घेता कपड्यांच्या निवडीवर आणि सांस्कृतिक मूल्यांवर भाष्य केलं. मुंबईत आयोजित ‘वुमन बिल्डिंग सिनेमा टुगेदर’ या कार्यक्रमात मधु चोप्रा सहभागी झाल्या होत्या. यावेळी पत्रकारांनी त्यांना रक्षाबंधन जाहिरातीवरून सुरू असलेल्या वादाबद्दल विचारलं. त्यावर उत्तर देताना मधु चोप्रा म्हणाल्या, ‘माझं शरीर, माझी पसंती’ ही संकल्पना योग्य आहे, पण त्याला एक मर्यादा असणं अत्यंत गरजेचं आहे. आपली स्वत:ची प्रतिमा जपणं आणि इतरांच्या सांस्कृतिक मूल्यांचा आदर करणं महत्त्वाचं आहे. आपण अशा ठिकाणी हे कपडे घालू शकतो जिथं ते सामान्य मानलं जातं, पण आपल्या परंपरेत आणि सणांच्या वेळी हे सामान्य नाहीए.
आपल्या मुलीबद्दल (प्रियांका चोप्रा) स्पष्टीकरण देताना त्या पुढे म्हणाल्या, असे कपडे आमची मुलंही घालतात. कामासाठी आणि वैयक्तिक आवडीसाठी ते परिधान करतात. पण सण आणि प्रसंगाला शोभून दिसेल असे कपड्यांचं जपणं गरजेचं आहे. प्रसंगाला साजेसे नसलं की त्यावर टीका होणारच.
तर झालं असं की, ‘GIVA’ या ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधन जाहिरातीत कृती सेनननं ब्रालेट-स्टाइल ब्लाऊज आणि स्कर्ट परिधान केला होता. पारंपरिक सणाच्या जाहिरातीत असा लूक अयोग्य असल्याचं सांगत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं.
जाहिरात मागे घेतली
वाढता वाद पाहून संबंधित ज्वेलरी ब्रँडनं ही जाहिरात आपल्या सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवली आणि दिलगिरी व्यक्त केली.
क्रितीचं स्पष्टीकरण
तर ट्रोलिंगला उत्तर देताना क्रिती सेनननं म्हटलं की, सण आणि संस्कृती ही मनात असते, कपड्यांच्या नेकलाइनमध्ये नाही. महिलांनी काय परिधान करावं हे सांगणं आता बंद केले पाहिजे.
याआधी अभिनेत्री कंगना रणौतनं देखील या जाहिरातीवर आणि दाखवलेल्या पद्धतीवर आक्षेप घेतला होता. या घटनेमुळं सध्या सोशल मीडियावर ‘वैयक्तिक स्वातंत्र्य विरुद्ध पारंपरिक मूल्ये’ या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली आहे
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा