Headlines

मनमाडमध्ये ट्रकची सहा वाहनांना धडक:इंदूर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प, चालकाला अटक‎




शहरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव ट्रक चालवत वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक देत सहा जणांना जखमी केले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. संतप्त नागरिकांनी पाठलाग करून चालकाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रक (आरजे ११ जीडी ४८११) मालेगावहून मनमाडकडे येत असताना चालकाने मद्य अथवा अन्य नशा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहेगाव परिसरापासूनच भरधाव ट्रक चालवत त्याने मार्गातील अनेक वाहनांना धडक दिली. मालेगाव चौफुली परिसरातही काही वाहनांना धडक दिल्यानंतर ट्रक थेट मनमाड शहरातील वर्दळीच्या भागात शिरला. रस्त्यावरील वाहनांसह पादचाऱ्यांनाही धडक दिली. रेल्वे पूल परिसरातील नगीना मशिदीजवळ काही नागरिकांनी प्रसंगावधान राखत ट्रक आडवा लावून थांबविला. अपघातात भिका बढे (६०), प्रवीण बढे (दोघे रा. पांझणदेव), गोरख नाईकवाडे (७६, रा. बोयेगाव), यशवंत भालनोर (५०, रा. कुंदलगाव), रोहित आहिरे (१९) व सचिन घोडके (रा. मनमाड) हे जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून एका जखमीला पुढील उपचारासाठी नाशिक येथे, तर दुसऱ्याला मालेगाव येथे हलविण्यात आले आहे. संतप्त नागरिकांनी ट्रकचा पाठलाग करून चालकाला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत