Headlines

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, भीषण दुर्घटनेत चार जणांचा अंत; ढिगाऱ्याखाली ७-८ नागरिक अडकल्याची भीती| Maharashtra Times


Thane News: महापालिकेने धोकादायक घोषित केलेली एक इमारात गुरुवारी रात्री कोसळल्याने चार जणांचा अंत झाला आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ७-८ कामगार अजूनही अडकलेले आहेत.

भिवंडी इमारत दुर्घटना
महेश गायकवाड, ठाणे: गुरूवारी रात्री भिवंडीमध्ये एक इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. दि. ३o जुलै २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील मौजे नारपोली येथे एक घटना घडली. बालाजी नगर, गंगाराम वाडी येथील कोहीनुर इमारत, तळमजला अधिक चार मजली होती. एनडीआरएफच्या पथकांनी आतापर्यंत एका महिलेला जिवंत बाहेर काढले असून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

दुरुस्तीचे काम सुरु असताना दुर्घटना

ढिगार्‍याखाली अवजड यंत्रसामग्रीच्या साहाय्याने काल रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. इमारतीत दुरुस्तीचे काम सुरू असतानाच ती कोसळली. स्थानिक रहिवाशांच्या दाव्यानुसार, अडकल्याची भीती असलेले लोक मजूर आहेत, जे इमारत अचानक कोसळली तेव्हा आत दुरुस्तीचे काम करत होते आणि ते ढिगाऱ्याखाली अडकले गेले. जवळच्या दुरुस्तीच्या कामातून मोठा आवाज ऐकू आल्यानंतर घबराट पसरली, कारण स्थानिक प्रशासनाने हा परिसर यापूर्वीच धोकादायक घोषित केला होता.

रात्री ११.०० ते ११.३० वाजताच्या दरम्यान बि ( B) विंग चा काही भाग कोसळला . ही इमारत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने यापूर्वीच धोकादायक घोषित केली होती. तरीही तिचे डागडुजीचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. सदर इमारतीत एकूण ४८ खोल्या होत्या, (प्रत्येक मजल्यावर १२ खोल्या. )रात्री ८.०० ते ९.०० वाजता इमारतीतून कर कर कट कट असा )आवाज येत असल्याने काही कुटुंबांना स्थानिक नागरिक यांच्या मदतीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. मात्र, काही लोक शिल्लक राहिल्याने ते बाहेर पडत असताना इमारतीचा ‘बी विंग’ भाग अचानक कोसळला.

बचावकार्य सुरू

सदर इमारतीच्या या दुर्घटनेत अंदाजे ७ ते ८ लोकं अडकले असून त्यामध्ये काही कामगारांचा समावेश आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी, मंडळ अधिकारी भोजणे भाऊसाहेब, भोईवाडा पोलिस स्टेशनचे कर्मचारी, माजी नगरसेवक भगवान टावरे तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. बचावासाठी NDRF टीम व भिवंडी फायर टीम श्वानपथकाच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करीत आहेत. घटनास्थळी २ ॲम्बुलन्स व १ जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

“भिवंडीमध्ये अशा अनेक इमारतील आहेत ज्यांना धोकादायक घोषित करण्यात आले आहे. आम्ही अडकलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा इमरातीत राहणाऱ्या रहिवाशांना घर तात्काळ रिकामं करण्याचा माझा सल्ला आहे,” असे भिवंडी निझामपूर शहर महानगरपालिकेचे महापौक नारायण चौधरी म्हणाले.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा