Headlines

भारताने मालिका गमावली, श्रेयस अय्यरने कोणाला ठरवलं व्हिलन? सामन्यानंतर काय म्हणाला?


Shreyas Iyer News : भारत आणि इंग्लंडमधील चौथा टी-२० सामना जिंकत इंग्लंडने मालिका ३-० ने खिशात घातली आहे. भारताच्या चौथ्या सामन्यातील पराभवासाठी कॅप्टन श्रेयस अय्यरने कोणाला व्हिलन ठरवलं? जाणून घ्या.

Shreyas Iyer News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा ९ विकेटने पराभव झाला. या विजयासह यजमान इंग्लंडने पहिल्यांदाच भारताने टी-२० मालिका जिंकली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने २० ओव्हरमध्ये १५८-७ धावा केल्या. यामध्ये ८० धावांची झुंजार खेळी करत भारताला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांसाठी हे आव्हान खूप कमी होतं. इंग्लंडने हे आव्हान १४व्या ओव्हरमध्ये पूर्ण करत सलग तिसरा विजय साकारला. अजूनही एकही सामना न जिंकलेल्या अय्यरने काय प्रतिक्रिया दिली जाणून घ्या.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

सामना पुन्हा एकदा खूप निराशाजनक होता. १५८ धावांचा टप्पा पुरेसा नव्हता आणि विरोधी संघाने तो खूप लवकर चेस केला. बॉलिंग करताना त्याने बॉलरना एकच लेंथ वारंवार टाकायला सांगितली होती. कारण मिडल आणि लेग स्टंपवरच्या बॉलवर शॉट मारणे कठीण होते, पण आम्ही आमची रणनीती योग्य प्रकारे राबवू शकलो नाही. जेव्हा आम्ही पेस बदलली किंवा वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी धीम्या चेंडूंवर चौकार-षटकार मारले. वैयक्तिक कामगिरीने मी खुश आहे पण संघ जिंकला नाही तर त्याला अर्थ नाही, दुर्दैवाने आज आमचा दिवस नव्हता, असं श्रेयस अय्यर म्हणाला.
Maharashtra TimesIND vs ENG 4th T20 : भारताचा सलग तिसरा पराभव, आयर्लंडनंतर इंग्लंडविरूद्धचीही मालिका गमावली, ब्रूक-साल्टची अर्धशतकी खेळी

सामन्याचा सविस्तर आढावा

भारतीय संघाकडून वैभव आणि अभिषेक सलामीला आले होते दोघांनी 23 धावा केल्या मात्र वैभव पुन्हा एकदा आर्चर विरुद्ध अपयशी ठरला. वैभव नंतर आलेला ईशान किशनही दादाच्या अंतरानंतर आउट झाला. पावर प्ले मध्ये गेलेल्या दोन विकेट नंतर एकही मोठी भागीदारी पाहिल्या मिळाली नाही. कॅप्टन अय्यरने ८० गावांची खेळी करत भारताला एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. मात्र इतर सर्व फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. ईशान किशन ४ धावा, शिवम दुबे २२ धावा, तिलक वर्मा ११ धावा, वॉशिंग्टन सुंदर ५ धावा, अक्षर पटेल १ धाव काढून स्वस्तात माघारी परतले होते. इंग्लंडकडून आर्चर आणि टंगने प्रत्येक दोन दोन विकेट घेतल्या. तर विल जॅक्स आणि राशीदने एक विकेट घेतली.
Maharashtra Timesएका फलंदाजाच्या 206 धावा, संघाच्या 417; टी-20 सामन्यात तब्बल 646 धावांचा पाऊस, षटकार तब्बल…
भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंह याने बटलरला आउट करत पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर आलेल्या कॅप्टन हॅरी ब्रूक आणि फील सॉल्ट यांनी नाबाद १४६ धावांची भागीदारी करत भारतावर ९ विकेटने विजय मिळवला. भारताकडून अर्शदीप सिंग सोडला तर कोणत्याच गोलंदाजाला विकेट मिळवण्यात यश आले नाही.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा