IND vs ENG 4th T20 Playing 11 News : भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या टी-२० सामन्याचा टॉस झाला आहे. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सलग सहावा टॉस जिंकलाय. करो या मरो अशा सामन्यामध्ये भारतीय संघात प्लेइंग ११ मध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या टी-20 सामन्याचा टॉस कॅप्टन श्रेयस अय्यरने जिंकला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजचा सामन्यात संजू सॅमसन याला खेळवणार असल्याचे चर्चा होती, मात्र तसे काही झाले नाही. कारण आजच्या सामन्यात प्लेइंगमध्ये दोन वेगळेच बदल पाहायला मिळाले आहेत. टीम मॅनेजमेंटने वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णा यांना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या संघात आल्याने हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती यांना बाहेर बसावे लागले. आजचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण, हा सामना गमावला तर मालिका इंग्लंड जिंकणार आहे. या मालिकेत इंग्लंडने आधीच 2-0 ने आघाडी घेतली आहे. जर आजचा सामना गमावला तर इंग्लंडकडे विजयी आघाडी असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ पूर्ण ताकतीने मैदानात उतरेल. Shreyas Iyer Captaincy : सलग पराभवांमुळे ट्रोल होणारा श्रेयस काही बोलला नाही, पण बहिणीने सगळ्यांचीच बोलती बंद केली भारतीय संघाचा स्टार खेळाडू अक्षर पटेल याचा हा १०० वा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात अक्षरकडून दमदारा कामगिरीची अपेक्षा असणार आहे. महेंद्र सिंह धोनीला मागे टाकत तो १०० व्यां दा भारताचे प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे. तर दुसरीकडे कॅप्टन श्रेयस अय्यर याने आज सलग सहाव्यांदा टॉस जिंकला असून तो सलग सहा टॉस जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला. पहिल्या क्रमांकावर धोनी असून त्याने सलग सात टॉस जिंकले आहेत. IND vs ENG : भारताचा सलग चौथा पराभव, कोच गंभीर म्हणतोय हरलो पण त्या खेळाडूचं भविष्य उज्ज्वल असणार, नेमका कोण? दरम्यान, रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादव याने भारतीय संघाची जबाबदारी पार यशस्वीपणे पार पाडली होती. मात्र त्यानंतर नवीन कर्णधार झालेल्या श्रेयस अय्यर यादव याला सहा सामन्यांमध्ये एकदाही जिंकत आलेले नाही. आजच्या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंच्या हातात त्यांची प्रतिष्ठा असणार आहेत.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा