ind vs Sl 2nd Test first Day Highlight : भारत आणि श्रीलंका संघामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी भारतावर पकड मिळवली आहे. भारताने ३०० धावा केल्या असून यजमान संघाने आज केलेल्या दोन मोठ्या चुकाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. नेमक्या कोणत्या जाणून घ्या.

पडिक्कलला पहिलं जीवदान त्याचं खातंही उघडलं नव्हतं तेव्हा मिळालं. लाहिरू कुमारा याने ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथ चेंडू टाकला. पडिक्कलने त्यावर ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गेला आणि तिथे क्षेत्ररक्षक दिनुशाकडे झेल घेण्याची संधी होती. मात्र, त्याला हा सोपा झेल पकडता आला नाही. ही संधी हातातून गेल्यानंतर कुमारा चांगलाच नाराज झालेला दिसला. यानंतर काही वेळातच श्रीलंकेनेआणखी एक मोठी चूक केली. केशरा नुवानथा याच्या गोलंदाजीवर पडिक्कलने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपच्या दिशेने गेला. तिथे श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा उभा होता. मात्र, त्याच्याकडूनही झेल सुटला. त्यामुळे पडिक्कलला दुसरं जीवदान मिळालं.
Devdutt Padikkal : 66 वर टीम इंडिया अडखळली, पडिक्कलनं पुन्हा शतक ठोकलं; 8 वर्षांत कुणालाच जमलं नव्हतं ते कोलंबोत करून दाखवलं!
या दोन संधी गमावल्यानंतर पडिक्कलने मागे वळून पाहिलं नाही. त्याने संयमी फलंदाजी करत डाव पुढे नेला आणि योग्य वेळी आक्रमक फटके खेळत आपलं शतक पूर्ण केलं. त्याच्या ११७ धावांच्या खेळीत १२ चौकारांचा समावेश होता. पडिक्कलच्या या खेळीमुळे भारतीय संघाला पहिल्याच दिवशी मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.
Yashaswi Jaiswal : 3 चौकार खाल्ले, विकेट घेताच श्रीलंकन गोलंदाज डिवचू लागला; यशस्वी थेट अंगावर धावला, कोलंबोत काय घडलं?श्रीलंकेच्या भूमीवर पडिक्कलची ही कामगिरी विशेष ठरली आहे. गेल्या काही दिवसांत त्याने तिथे सातत्याने धावांचा पाऊस पाडला आहे. सराव सामन्यात शतक केल्यानंतर गॉल कसोटीत त्याने पहिल्या डावात १६७ धावा आणि दुसऱ्या डावात ४४ धावा केल्या. आता कोलंबो कसोटीत ११७ धावांची खेळी करत त्याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळालेल्या या संधीचं पडिक्कलने सोनं केलं असून, भारतीय संघातील आपलं स्थान मजबूत करण्याच्या दिशेने त्याने आणखी एक पाऊल टाकलं आहे.
Karn Sharma Retirement : विराट कोहलीसोबत पदार्पण, कॅप नंबर ‘२८३’चा १९ वर्षांनी क्रिकेटला अलविदा; सलग ३ आयपीएल ट्रॉफी जिंकणारा खेळाडू नेमका कोण?
पहिल्या दिवसाचा खेळ संपतना भारताने ८५ ओव्हरमध्ये ३००-५ धावा केल्या आहेत. यामध्ये देवदत्त पडिक्कल ११७ धावा, शुभमन गिल ५०० धावा, यशस्वी जयस्वाल ४५ धावा आणि रवींद्र जडेजाने ४३ धावा केल्या आहेत. के.एल. राहुल १८ धावा, ऋषभ पंत ३ धावा काढून स्वस्तात परतले असून आता मैदानात ध्रुव जुरेल नाबाद ७ धावा आणि सारांश जैन नाबाद ४ धावांवर खेळत आहे.

