Headlines

भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवसच ठरणार टर्निंग पॉइंट, श्रीलंकेच्या खेळाडूंकडून 2 मोठ्या चुका; भारताने उभारला 300 धावांचा डोंगर


ind vs Sl 2nd Test first Day Highlight : भारत आणि श्रीलंका संघामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी भारतावर पकड मिळवली आहे. भारताने ३०० धावा केल्या असून यजमान संघाने आज केलेल्या दोन मोठ्या चुकाच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतात. नेमक्या कोणत्या जाणून घ्या.

IND vs SL 2nd Test Match
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या देवदत्त पडिक्कलने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात पडिक्कलने ११७ धावांची दमदार खेळी करत पुन्हा एकदा शतक झळकावलं. विशेष म्हणजे या खेळीदरम्यान श्रीलंकेच्या क्षेत्ररक्षकांनी त्याला दोन वेळा जीवदान दिलं. या चुका श्रीलंकेच्या संघाला चांगल्याच महागात पडल्या आणि पडिक्कलने त्यानंतर गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली.

पडिक्कलला पहिलं जीवदान त्याचं खातंही उघडलं नव्हतं तेव्हा मिळालं. लाहिरू कुमारा याने ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथ चेंडू टाकला. पडिक्कलने त्यावर ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने गेला आणि तिथे क्षेत्ररक्षक दिनुशाकडे झेल घेण्याची संधी होती. मात्र, त्याला हा सोपा झेल पकडता आला नाही. ही संधी हातातून गेल्यानंतर कुमारा चांगलाच नाराज झालेला दिसला. यानंतर काही वेळातच श्रीलंकेनेआणखी एक मोठी चूक केली. केशरा नुवानथा याच्या गोलंदाजीवर पडिक्कलने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपच्या दिशेने गेला. तिथे श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा उभा होता. मात्र, त्याच्याकडूनही झेल सुटला. त्यामुळे पडिक्कलला दुसरं जीवदान मिळालं.

Maharashtra TimesDevdutt Padikkal : 66 वर टीम इंडिया अडखळली, पडिक्कलनं पुन्हा शतक ठोकलं; 8 वर्षांत कुणालाच जमलं नव्हतं ते कोलंबोत करून दाखवलं!
या दोन संधी गमावल्यानंतर पडिक्कलने मागे वळून पाहिलं नाही. त्याने संयमी फलंदाजी करत डाव पुढे नेला आणि योग्य वेळी आक्रमक फटके खेळत आपलं शतक पूर्ण केलं. त्याच्या ११७ धावांच्या खेळीत १२ चौकारांचा समावेश होता. पडिक्कलच्या या खेळीमुळे भारतीय संघाला पहिल्याच दिवशी मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.

Maharashtra TimesYashaswi Jaiswal : 3 चौकार खाल्ले, विकेट घेताच श्रीलंकन गोलंदाज डिवचू लागला; यशस्वी थेट अंगावर धावला, कोलंबोत काय घडलं?श्रीलंकेच्या भूमीवर पडिक्कलची ही कामगिरी विशेष ठरली आहे. गेल्या काही दिवसांत त्याने तिथे सातत्याने धावांचा पाऊस पाडला आहे. सराव सामन्यात शतक केल्यानंतर गॉल कसोटीत त्याने पहिल्या डावात १६७ धावा आणि दुसऱ्या डावात ४४ धावा केल्या. आता कोलंबो कसोटीत ११७ धावांची खेळी करत त्याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मिळालेल्या या संधीचं पडिक्कलने सोनं केलं असून, भारतीय संघातील आपलं स्थान मजबूत करण्याच्या दिशेने त्याने आणखी एक पाऊल टाकलं आहे.

Maharashtra TimesKarn Sharma Retirement : विराट कोहलीसोबत पदार्पण, कॅप नंबर ‘२८३’चा १९ वर्षांनी क्रिकेटला अलविदा; सलग ३ आयपीएल ट्रॉफी जिंकणारा खेळाडू नेमका कोण?
पहिल्या दिवसाचा खेळ संपतना भारताने ८५ ओव्हरमध्ये ३००-५ धावा केल्या आहेत. यामध्ये देवदत्त पडिक्कल ११७ धावा, शुभमन गिल ५०० धावा, यशस्वी जयस्वाल ४५ धावा आणि रवींद्र जडेजाने ४३ धावा केल्या आहेत. के.एल. राहुल १८ धावा, ऋषभ पंत ३ धावा काढून स्वस्तात परतले असून आता मैदानात ध्रुव जुरेल नाबाद ७ धावा आणि सारांश जैन नाबाद ४ धावांवर खेळत आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा