Headlines

भारत वि. झिम्बाब्वे शेवटचा सामना, भारताच्या प्लेइंग 11 मधून दोघांचा पत्ता कट, कोणाची झाली एन्ट्री?


ZIM vs IND 3rd T20 Playing 11 News : भारत आणि झिम्बाब्वेमधील सामन्याल सुरूवात झाली आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरा सामना जिंकल्यावरही भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. कोणते जाणून घ्या.

ZIM vs IND 3rd T20 Playing 11
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वेमध्ये आज तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना पार पडत आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकला आहे. भारत पहिल्यांदा फलंदाजी करणार असून या सामन्यात भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. शेवटच्या सामन्यामध्ये कॅप्टन श्रेयस अय्यर याने प्रिन्स यादव आणि शिवम दुबे यांना बाहेर केले आहे. तर यामधील प्रिन्स हा दुखापतीमुळे बाहेर बसला आहे. दोघांच्या जागी कोणाला संधी मिळाली हे जाणून घ्या.

सूर्यांश शेडगे आणि प्रिन्सच्या जागेवर अशोक शर्मा याची निवड करण्यात आली आहे. सूर्यांश हा नवखा खेळाडू असून दुबेची फार काही गरज भासली नाही. त्यामुळे या युवा खेळाडूला संधी देण्यात आलीय. मागील दोन सामन्यात दुबे याला बॅटिंग करायला मिळाली नाही. त्यामुळे सूर्यांशला चाचपण्यासाठी हा निर्णय मॅनेजमेंटने घेतला असावा.
Maharashtra TimesIND vs ZIM 3rd T20 : भारत वि. झिम्बाब्वे आज शेवटचा सामना, भारतीय संघात 4 मोठे बदल होणार? अभिषेक शर्मालाही बाहेर करण्याची शक्यता
आजच्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी याच्याकड सर्वांच्या नजर असतील. पहिल्या वनडेमध्ये ५० धावा करत झकास सुरूवात केली होती. पण गेल्या मागील सामन्यात चांगली सुरूवात मिळूनही त्याचे मोठ्या खेळीमध्ये त्याला रूपांतर करता आले नाही. त्यामुळे मालिकतील हा शेवटचा सामना असल्याने सर्वांना त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत. कारण आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर वैभवला एकही अर्धशतक करता आले नव्हते. त्यामुळे त्याला पाचव्या टी-२० सामन्यात प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले गेले नव्हते. त्यामुळ आज जाता-जाता वैभव काही राडा घालून जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra TimesIND vs ZIM : आता कसा जागेवर आला! ‘भारताच्या दोन खेळाडूंमुळे हरलो’; पहिल्या मॅचमध्ये पिचला नाव ठेवणाऱ्या सिकंदरने आता कोणाची नावे घेतली

दोन्ही संघांची प्लेइंग ११

झिम्बाब्वे (प्लेइंग ११): ब्रायन बेनेट, बेन कुरान, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेसली मधेवेरे, तदिवानाशे मारुमणी (विकेटकीपर), ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी

भारत (प्लेइंग ११): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, सूर्यांश शेडगे, रवी बिश्नोई, यश ठाकूर, मयंक यादव, अशोक शर्मा

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा