Headlines

भारत, पाक संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश


आशियाई क्रीडा स्पर्धा, नागोया, जपान लोगो

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

चीनमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूष आणि महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान या स्पर्धेतील विद्यमान विजेते संघ भारत आणि पाकिस्तान यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरूषांच्या क्रिकेटला 24 सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून 1 ऑक्टोबरला या क्रीडा प्रकाराचा समारोप होईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक संघामध्ये कदाचित उपांत्य फेरीत गाठ पडू शकेल. महिलांच्या क्रिकेटला 17 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून 22 सप्टेंबरला या क्रीडा प्रकाराचा समारोप होईल. पुरूषांच्या विभागात एकूण 10 संघांचा समावेश आहे. प्राथमिक टप्प्यात अफगाण, जपान, नेपाळ यांचा अ गटात तर हाँगकाँग, चीन, मलेशिया आणि ओमन यांचा ब गटात समावेश आहे. आशियाई स्पर्धेत पुरूष आणि महिलांसाठी टी-20 क्रिकेटचा क्रीडा प्रकार खेळविला जाईल.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय पुरूष संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे तर महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपविण्यात आले आहे. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात चौथ्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी 2010, 2014 आणि 2023 च्या आशियाई स्पर्धेत हा क्रीडा प्रकार खेळविला गेला होता.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत