मालवण, प्रतिनिधी : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, पेंडूर येथील सुमित अरुण सावंत यांची भाजयुमो मालवण-ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजयुमो सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संदीप चंद्रकांत मेस्त्री यांनी नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले असून, ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सुमित सावंत यांच्या निवडीमुळे मालवण ग्रामीण भागातील भाजप युवा मोर्चाची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नियुक्ती जाहीर झाल्यानंतर झालेल्या बैठकीस जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, युवा मोर्चा सरचिटणीस संतोष पुजारे व जावेद खतीब, उपाध्यक्ष सिद्धेश रावराणे व राकेश सावंत, मालवणचे नगरसेवक ललित हरी चव्हाण, जिल्हा चिटणीस देवेंद्र शेटकर, कुडाळ भाजयुमो उपाध्यक्ष जयेश चिंचळकर व प्रसाद कृष्णा पाटकर, कुडाळ युवा अध्यक्ष तन्मय वालावलकर, मयूर राणे, विनेश तावडे, सावंतवाडी युवा अध्यक्ष हितेश नाईक, परेश कांबळी, सागर पवार, शुभम परब, कणकवली युवा अध्यक्ष सर्वेश दळवी, देवगड भाजप अध्यक्ष अतुल सरवटे, कणकवली भाजयुमो सरचिटणीस प्रशांत राणे, कणकवली शहराध्यक्ष सागर राणे, युवा तालुकाध्यक्ष सहदेव खाडे, नयन दळवी, बांदा युवा अध्यक्ष सिद्धेश कांबळी, पराशर सावंत यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुमित सावंत यांच्या नियुक्तीबद्दल भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पेंडूर व मालवण परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
