Headlines

फुटबॉल मॅचदरम्यान वीज कोसळली, 24 वर्षीय खेळाडू जागेवरच दगावला; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ


Lightning strike during football match : फुटबॉलचा सामना सुरु असताना अचानक वीज कोसळली आणि त्यामध्ये एका फुटबॉलपटूचा जागीच मृत्यू झाला आहे. या वीजेच्या धक्क्याने आणखी १२ खेळाडू जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

Lightning strike during football match
मुंबई : फुटबॉल सामन्याचा थरार सुरु होता. पण अचानक नैसर्गिक आपत्ती आली. वीज कोसळली आणि २४ वर्षांच्या फुटबॉलपटू सोफवान अवाई याचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. याच घटनेमध्ये इतरही १२ खेळाडू हे जखमी झाले आहेत. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, वीज पडल्याने मोठा स्फोट झाला आणि एक खेळाडू खाली कोसळला.

मिळालेल्या माहितीनुसार विंगर प्लेअर सोफवान अवाई या घटनेत प्रचंड जखमी झाला होता. माध्यमांमधील वृत्तांनुसार ही घटना हौशी आणि थाई या मलेशियन स्थानिक सॅमकोल्ट्स आणि अबू नॉन्ग सिरिन या संघांमध्ये सुरु असलेल्या सामन्यादरम्यान घडली आहे. या स्पर्धेचे नाव ‘गोलोक एफए कप’ असं असल्याची माहितीही समोर आली आहे.

Maharashtra TimesAjinkya Rahane : अजिंक्य रहाणेला का वाटतेय टीम इंडियाची चिंता? भारतीय क्रिकेटमध्ये काय गंडतंय, निवृत्तीनंतर पहिल्यांदाच थेट बोलला

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्यानंतर क्रिडा प्रेमींमध्ये शोककळा पसरली. नेटकऱ्यांनी खराब हवामानाच्या परिस्थितीत सामना आयोजित करण्यावरही नाराजी व्यक्त केली आहे. एकाने लिहिलं की, हवामान खराब झाले होते. तेव्हाच सामना थांबवणे गरजेचे होते, या घटनेने खूप दुःख झाले. किमान यापूढे तरी अशा प्रकारचा नियम असायला हवा. अनेक युजर्सही या घटनेवर विविध प्रतिक्रिया देत त्यांची मतं व्यक्त केली. त्याचबरोबर मृत सोफवानला श्रद्धांजली वाहिली. काहींनी त्याच्या मृत्यूला स्पर्धेच्या आयोजकांना जबाबदार धरत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली आहे.

बरनामामधील वृत्तानुसार या घटनेबद्दल पोलिसांनी सांगतिलं की, आम्ही जखमी झालेल्या सोफवानला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. फुटबॉल असोशिएशन थाइलंडने शोक व्यक्त केला आहे.

Maharashtra TimesGeorgina Rodriguez Trolling : गर्लफेंडला ‘जाड’ म्हणून हिणवलं, ख्रिस्तियानो रोनाल्डोनं ट्रोलर्सची तोंडंच बंद केली, नेमकं काय म्हणाला?

दरम्यान, ‘द इंडिपेंडेंट’ने दिलेल्या वृत्तानुसार थायलंडमध्ये वीज पडून होणारे मृत्यू ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हवाल्याने दिलेल्या आकड्यांनुसार २०२० ते २०२४ दरम्यान देशामध्ये २८३ लोकांचा मृत्यू हा केवळ वीज कोसळल्याने झाला आहे. यातील अनेकांना जागीच जीव सोडावा लागला होता.