Headlines

फिफ्टीच्या सेलिब्रेशनमधून आईला खास सलाम, वैभवने ड्रेसिंग रूमकडे पाहून नेमकं काय केलं? पाहा व्हिडिओ


Vaibhav Sooryavanshi A celebration : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीने अवघ्या १८ चेंडूंत अर्धशतक ठोकलं. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने ड्रेसिंग रूमच्या दिशेने ‘A’ इशारा केला. वैभवच्या या सेलिब्रेशनमागे एक खास व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे.

Vaibhav Suryavanshi A celebration Video
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात अवघ्या १८ चेंडूंत अर्धशतक ठोकत वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला. आपल्या वादळी फलंदाजीने त्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र, या सामन्यानंतर वैभवच्या फलंदाजीसोबतच त्याच्या खास सेलिब्रेशनचीही चर्चा रंगली आहे. अर्धशतक पूर्ण करताच वैभवने ड्रेसिंग रूमच्या दिशेने बोटांनी ‘A’ अक्षराचा इशारा केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच त्याचं हे सेलिब्रेशन पाहायला मिळालं. सोशल मीडियावर या इशाऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र, या A सेलिब्रेशनमागे वैभवच्या आईशी जोडलेली एक भावुक कहाणी आहे.

आईसाठी खास संदेश

वैभव सूर्यवंशी गेल्या काही महिन्यांपासून अर्धशतक केल्यानंतर A साइन करत आहे. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतरही त्याने असंच सेलिब्रेशन केलं होतं. त्यावेळी समालोचक मुरली कार्तिक यांनी वैभवला या सेलिब्रेशनबाबत विचारलं होतं. मात्र, मैदानावरील आपल्या प्रतिक्रिया नैसर्गिक असतात, असं सांगत त्याने यामागे विशेष कारण नसल्याचं म्हटलं होतं.

Vaibhav Suryavanshi A celebration

Maharashtra TimesWorld Test Championship : विराट-रोहित नाही, 9 जूनपासून द ओव्हलवर WTCची फायनल; पाचव्या स्थानावरील भारताला अंतिम फेरी गाठता येणार?
मात्र, राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये या सेलिब्रेशनमागचं खरं कारण समोर आलं. टीम मॅनेजर रोमी भिंडर यांच्याशी संवाद साधताना वैभवने सांगितलं की, हे सेलिब्रेशन त्याची आई आरती यांच्यासाठी आहे. त्याच्या आईचं नाव A अक्षराने सुरू होत असल्यामुळे वैभव प्रत्येक खास खेळीनंतर या पद्धतीने त्यांना सलाम करतो.

१८ चेंडूंत झंझावाती फिफ्टी

झिम्बाब्वेविरुद्ध वैभवने मैदानात उतरताच आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. त्याने १८ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. रिचर्ड नगारवा, ब्रॅड इव्हान्स आणि ब्लेसिंग मुजाराबानी यांच्या गोलंदाजीवर त्याने चौफेर फटकेबाजी केली. नगारवाच्या एका षटकात त्याने ९९ मीटरचा षटकारही ठोकला. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. मात्र, त्याआधी भारताला विजयाच्या दिशेने नेण्याचं काम त्याने केलं.

Maharashtra TimesMayank Yadav : 19 चेंडूंत अर्धशतक करूनही वैभवला पुरस्कार नाही; मयंक यादवच का ठरला सामनावीर?

इंग्लंडमधील अपयशानंतर दमदार कमबॅक

इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत वैभवला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. सलग तीन डावांत त्याला १५ धावांचा टप्पाही पार करता आला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, झिम्बाब्वेविरुद्ध मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. या अर्धशतकासह टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा फलंदाज ठरत त्याने विक्रमही आपल्या नावावर केला.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा