Headlines

पुण्यात ३६ किमी लांब ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग’, उन्नत मार्गावरून टोल-मुक्त प्रवास; कसा असेल प्रकल्प?| Maharashtra Times


म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील वाहतूक कोंडीवरील दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर), वर्तुळाकार मार्ग (रिंग रोड) आणि भुयारी मार्ग (बोगदे) या तीन पर्यायांचा समावेश आहे. या तिन्ही उपाययोजनांपैकी एचसीएमटीआर प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ९००० कोटी रुपये खर्चाच्या या ३६ किलोमीटर लांब व २४ मीटर रुंद उन्नत मार्गाचे काम पावसाळा संपल्यानंतर तातडीने सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी सुधारित प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असून, या मार्गावर टोल लावण्यात येणार नाही.

या तिन्ही प्रकल्पांसंदर्भात महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ‘‘एचसीएमटीआर’ प्रकल्पासाठी केवळ १५ टक्के जागेचेच संपादन करावे लागणार आहे. सुमारे ६० टक्के जमीन सरकारची असून, २५ टक्के भागावर सध्या रस्ते अस्तित्वात आहेत. विद्यमान आराखड्यात मेट्रो मार्गाशी १० ठिकाणी ‘क्रॉस सेक्शन’ होत असून, त्याबाबत मेट्रोशी चर्चा केली जाईल. शहराच्या वाहतुकीला गती देण्यासाठीच्या तिन्ही प्रकल्पांपैकी हा प्रकल्प सर्वांत आधी पूर्ण होऊ शकतो. त्यामुळेच या प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. काही टप्प्यात (पॅकेजेस) हे काम केले जाईल,’ असे राम यांनी सांगितले.

Maharashtra TimesGoregaon-Mulund Link Road: पश्चिम द्रुतगती महामार्गासाठी पर्यायी मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा पूर्ण; उड्डाणपूल लवकरच सेवेत

आवश्यकतेनुसारच बोगदे

शहरात बोगद्यांचे जाळे करण्याचेही प्रस्तावित आहे. मात्र, हा प्रकल्प आवश्यकतेनुसारच राबवला जाईल. ‘एचसीएमटीआर’, ‘रिंग रोड’व बोगदे तिन्ही प्रकल्प एकमेकांना जोडलेले असतील. या तिन्ही प्रकल्पांसाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक व प्रकल्प सल्लागार नेमले जातील, असे नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.

“एचसीएमटीआर, बोगदे हे प्रकल्प मार्गी लागल्यानंतर शहरातील – वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी संपेल. रिंग रोडमुळे शहरातील जड वाहतूक ४० टक्क्यांनी कमी – होईल. एचसीएमटीआर शहरातून जाणारा व सर्वाधिक वापराचा असल्याने त्यावर ‘टोल’ आकारण्याचा विचार नाही,” नवलकिशोर राम, आयुक्त, महापालिका.

रिंग रोडलाही मिळणार गती

रिंग रोड या २७ हजार कोटी रुपये खर्चाच्या आणि ८३ किलोमीटर लांबीच्या मार्गाचा सर्वाधिक भाग महापालिकेच्या हद्दीत येतो. ४४ गावांमधील भूसंपादन, स्थानिकांच्या अपेक्षा आणि भरपाईचे दर याबाबत पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. प्रत्येक गावातील अडचणींचा स्वतंत्रपणे आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय होईल. यासाठी तीन-चार स्वतंत्र भूसंपादन अधिकारी नेमण्यात येतील. या प्रकल्पासाठी ‘टीडीआर’चा पर्याय उपलब्ध नसल्याने निधी उभारणीसाठी ‘हुडको’सह अन्य वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले.

Maharashtra TimesMumbai Traffic: मुंबईतील दोन महत्त्वाच्या उड्डाणपुलांच्या कामांना वेग; शीव-पनवेल महामार्गावर कोंडी फुटणार; कसे असतील मार्ग?

असा असेल ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प

पूर्णत: उन्नत (एलिव्हेटेड)
लांबी : ३६ किलोमीटर
रूंदी : २४ मीटर
अंदाजित खर्च : ९००० कोटी
मुदत : कार्यादेशानंतर अडीच ते तीन वर्ष

पुण्यातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हे सर्व प्रकल्प खरचं फायदेशीर ठरतील का? महापालिकेने विद्यमान रस्त्यांवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत