Chhatrapati Sambhajinagar: ऐन पावसाच्या दिवसात मात्र मराठवाडा कोरडा पडलाय. पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने उपलब्ध पाण्याचा वापर जपून करा असे निर्देश महापालिकेने दिलेत. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांकडून दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं. निर्देश देऊन देखील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या पैठण गेट परिसरातील एका व्यक्तीकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

पाणी बचतीचे महापालिकेकडून वारंवार आवाहन
शहरवासीयांनी पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याबाबत महापालिकेकडून वारंवार आवाहन केले जाते. मात्र, तरीही नागरिक पाणी वाया घालवतानाचे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळते. अशांविरुद्ध पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध कडक दंडात्मक
पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी पैठण गेट परिसरातून झाली. एका नागरिकाकडून पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला.
रस्त्यावरून पाणी मोठ्या प्रमाणावर वाया
शुक्रवारी सकाळी पालिका आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या निदर्शनास पैठण गेट येथील देशमुख यांच्या घरातील पाण्याची टाकी भरल्यानंतरही नळ बंद न करता पाणी रस्त्यावर सोडल्याचे निदर्शनास आले. रस्त्यावरून पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात होते.
नागरिकांनी पाणी वापरताना अधिक जबाबदारीने वागणे
याची गंभीर दखल घेत येडगे यांनी संबंधित नागरिकावर दहा हजारांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. पाण्याचा अशा पद्धतीने अपव्यय करणे योग्य नसून नागरिकांनी पाणी वापरताना अधिक जबाबदारीने वागणेआवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचे पाणी घरगुती वापरासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक घेणे, पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, टाकीतून ओव्हरफ्लो होणारे पाणी रस्त्यावर सोडणे, घरासमोरी रस्ते,परिसर धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे, वाहन धुताना मोठ्या प्रमाणात पाणी वापरणे, नळ जलवाहिनीतून होणारी गळती वेळेत दुरूस्त न करणे आदी प्रकार टाळावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
पाण्याचा अपव्यय केल्याने भीषण दुष्काळ
शहरात कोणत्याही नागरिकाकडून पाणी रस्त्यावर सोडणे अथवा कोणत्याही स्वरूपात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त येडगे यांनी दिला आहे. पाण्याचा अपव्यय केल्याने भीषण दुष्काळ, भूजलाची घटती पातळी आणि पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. त्यामुळे शेती, उद्योग आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन आर्थिक संकट उभे राहते. भविष्यातील तीव्र जलसंकट टाळण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
Tukaram Mudhe : भाजी करण्यासाठी दुर्गंधीयुक्त पनीर, तुकाराम मुंढेंची पुन्हा धडक कारवाई, तपासणीत गंभीर त्रुटी; नामांकित हॉटेलला दणका
छत्रपती संभाजीनगर : उघड्यावर व विनापरवानगी मांसविक्री करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या पथकाने पाहणी करून दहा जणांना नोटीस बजावल्या. त्यातील सात जणांकडून ११ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. शुक्रवारी ही मोहीम राबविण्यात आली. शहर परिसरात परवानगी न घेता मांस विक्री करणाऱ्यांनी सात दिवसात ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे, अन्यथा कारवाईचा इशारा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने दिला होता.
सात जणांकडून ११ हजारांचा दंड वसूल
अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारपासून कारवाई सुरू केली. शुक्रवारी उद्यान अधीक्षक विजय व पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख विजय पाटील यांच्या नेतृत्वात अनंत जाधव, रवींद्र घडमोडे, लक्ष्मण फुले, बाळासाहेब तुपे यांच्या पथकाने दहा जणांना नोटीस बजावल्या. त्यातील सात जणांकडून ११ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

