Headlines

पाच दिवसांच्या घसरणीला विराम, शेअरबाजारात तेजी


सेन्सेक्स 776 अंकांनी तर निफ्टी 228 अंकांसह तेजीत : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

वृत्तसंस्था, मुंबई

गिफ्ट निफ्टीतली तेजी, आशियाई बाजारातील तेजी व कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण याने शेअरबाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगली तेजी दिसली. सेन्सेक्स 776 अंक तर निफ्टीने 228 अंकांनी तेजी राखत बंद होण्यात यश मिळवले.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 776 अंकांनी वाढत 76835 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 228 अंकांनी वाढत 23995 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकही तेजीत होता, तो दिवसअखेर 393 अंकांनी वाढत 57087 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 समभागांमध्ये तेजी होती तर निफ्टीत 50 पैकी 44 समभागांमध्ये मजबुती दिसून आली. बँक निफ्टीतील 14 पैकी 9 बँका तेजीत होत्या. ब्रेंट व्रुड कच्चे तेल घसरत 90 डॉलर प्रति बॅरलवर राहिले होते. कच्च्या तेलाच्या किमती जवळपास 7 टक्के इतक्या खाली आल्या होत्या.

समभागांची कामगिरी

समभागांचा विचार करता निफ्टीत इटर्नल, इंटरग्लोब एव्हिएशन आणि इन्फोसिस यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले होते. चांगल्या तेजीमुळे शेअरबाजारालाही मजबूत आधार देण्याचे काम या समभागांनी केले. यासोबत बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, मॅक्स हेल्थकेअर, आयशर मोटर्स, टायटन, आयटीसी, लार्सन टुब्रो, टाटा स्टील, रिलायन्स इंडस्ट्रिज, अदानी पोर्टस, एसबीआय, ट्रेंट, जियो फायनान्स, ग्रासिम, एनटीपीसी, टाटा कंझ्युमर, टीसीएस, विप्रो, बजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, कोल इंडिया, अपोलो हॉस्पिटल, भारती एअरटेल, नेस्ले इंडिया यांचे समभाग तेजीत होते. तर दुसरीकडे सिप्ला, डॉ. रे•िज लॅब्ज, एचडीएफसी लाइफ, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक व ओएनजीसी यांचे समभाग मात्र कमकुवत होत बंद झाले.

निफ्टी मिडकॅप निर्देशांक 1.11 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 1.31 टक्के इतका मजबूत होत बंद झाला. याचाच अर्थ गुंतवणूकदारांचा कल फक्त लार्ज कॅप निर्देशांकातील समभाग खरेदी करण्याकडे नव्हता, तर त्यांनी स्मॉल व मिडकॅपमधील समभाग खरेदी करणे पसंत केलेले दिसून आले.

आयटी, मीडिया, रियल्टी निर्देशांक तेजीत

विविध क्षेत्राच्या निर्देशांकाचा विचार करता आयटी, मीडिया व रियल्टी या क्षेत्राच्या निर्देशांकानी चांगले प्रदर्शन सोमवारी केले. ऑईल व गॅस मात्र कमकुवत राहिला होता. याखेरीज फार्मा व मेटल यांचे निर्देशांक तेजीत राहिले होते. कच्च्या तेलाच्या किमतीत 7 टक्के इतकी घसरण झाल्याने भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत झालेला दिसला. रुपया जवळपास 0.67 पैसे मजबूत झाला.

……………



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत