![]()
बलुचिस्तानमध्ये पाक सैन्याविरुद्धच्या लढाईने नवे आणि अधिक धोकादायक रूप घेतले आहे. पाकिस्तानी गुप्तहेर सूत्रांचा दावा आहे की बलुच बंडखोरांना आता इस्रायली यंत्रणांकडून पैसा, तंत्रज्ञान आणि आधुनिक दळणवळणाची साधने मिळत आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर त्यांच्या तळांसाठी आणि हालचालींसाठी केला जात आहे. स्थानिक बंडखोर नेटवर्क, अफगाण मार्ग आणि कथित परदेशी तांत्रिक मदत यांच्या या हातमिळवणीस पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा बलुचिस्तानमध्ये उदयास आलेले ‘नवे समीकरण’ म्हणत आहे. हा दावा अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा जियारत येथील मांगी डॅम पंपिंग स्टेशनच्या पोलिस चौकीवरील हल्ल्याने पाक सैन्याच्या सुरक्षा तयारीची पोलखोल केली. बीएलए बंडखोरांनी आधी नऊ पोलिसांची हत्या केली आणि १८ जणांचे अपहरण केले. नंतर या सर्वांचे मृतदेह टेकड्यांवर सापडले. एकूण २७ पोलीस जवानांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय सात मृतदेहांसह धरणे आंदोलनाला बसले आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांनी मृतदेह दफन करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानी सैन्याने फ्रंटियर कोर, पोलिस आणि दहशतवादविरोधी दलाच्या सोबत ‘ऑपरेशन शाबान’ सुरू केले आहे. ४४% भूभाग, ६% लोकसंख्या; कमाई केंद्र व चीनकडे गेल्याने राग बलुचिस्तान हा पाकिस्तानचा ४४% भूभाग आहे, तर देशाच्या एकूण लोकसंख्येत त्याची भागीदारी ६ %आहे. तांबे, सोने, कोळसा, नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत. यातील कमाईचा मोठा हिस्सा केंद्र सरकार, सैन्य व चीनी कंपन्यांना जात असल्याचा आरोप आहे.यामुळे लोकांत संताप आहे. आंदोलन: मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह दफन करण्यास नकार मृत पोलिसांच्या नातेवाइकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत मृतदेह दफन करण्यास नकार दिला आहे. जियारत येथे पोलीस नातेवाईक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जियारत, हरनाई, हन्ना उरक, शाबान, जरघून आणि आसपासच्या भागातून बंडखोर नेटवर्क पूर्णपणे नष्ट करण्यात यावे, अशी नातेवाइकांची मागणी आहे. यासोबतच ते लेव्हीज फोर्सची पुनर्बहाली करण्याची मागणी करत आहेत. दडपशाही वाढली: ‘सक्तीचे बेपत्ता’ करण्याचे गतवर्षी ५०० वर गुन्हे बलुच संघटनांनुसार, २०२५ मध्ये ५४६ लोकांना सक्तीने बेपत्ता केल्याची प्रकरणे समोर आली. या प्रांतात सैन्य व सुरक्षा यंत्रणांवर खटला न चालवता लोकांना उचलणे, बनावट चकमकींतून दडपशाही केल्याचे आरोप आहेत. सरकारी तपास आयोगाच्या माहितीनुसार, १४ वर्षांत सक्तीने बेपत्ता केल्याच्या २८८८ तक्रारी आहेत. बलुच हक्क आंदोलनाचा सर्वात मोठा चेहरा डॉ. महरंग बलोच या देखील तुरुंगात आहेत. वाढता असंतोष : गतवर्षी बंडखोरांच्या २५४ हल्ल्यांत १ हजार जणांचा मृत्यू बलुचिस्तानमधील बंडखोरी आता केवळ तुरळक राहिलेली नाही, तर ते एक सुरक्षा संकट बनले आहे. पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीजच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये या प्रांतात २५४ हल्ले झाले. हे प्रमाण २०२४ च्या तुलनेत २६% अधिक होते. या घटनांमध्ये १,०२६ जणांचा मृत्यू झाला. मात्र, बीएलएने आपल्या अहवालात २०२५ मध्ये केलेल्या ५२१ हल्ल्यांत १,०६० सुरक्षा जवानांना मारल्याचा दावा केला आहे. हल्ल्यांची पद्धतही बदलली आहे. बंडखोर आता पोलीस चौक्या, रेल्वे, महामार्ग आणि लष्करी ताफ्यांवर मोठे आणि संघटित हल्ले करत आहेत.
Source link
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात नवे समीकरण:पाक सैन्य कोंडीत; बलुच बंडखोरांना आता इस्रायली यंत्रणा करतात मदत
