Navi Mumbai Flyover: 2 एप्रिल रोजी नवी मुंबई वनमंत्री गणेस नाइक यांच्ये हस्ते नव्या उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं. पाम बीच मार्ग ते सायन-पनवेल महामार्गापर्यंत जोडणारा या कनेक्टरमुळे प्रवासात 10 – 15 मिनिटे वाचणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, नवी मुंबई: नवी मुंबई येथील सेक्टर १७ वाशी येथील पामबीच मार्गावरून सायन–पनवेल महामार्गाशी थेट जोडणारा महत्वाकांक्षी उड्डाणपूल लोकार्पित करण्यात आला आहे. या नव्या पुलामुळे पुण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना वळसा घालण्याची गरज नाहीशी होणार असून, प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोपा होईल. सिग्नल फ्री कनेक्टिव्हिटीमुळे वाहतुकीतील अडथळे कमी होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
कसा असेल मार्ग?
हा उड्डाणपूल वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली परिसरातून पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. थेट सायन–पनवेल महामार्गाशी जोडल्यामुळे वाहनचालकांना सिग्नलवर थांबावे लागणार नाही आणि प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे दैनंदिन कामधंद्याच्या प्रवासात येणारा ताण आणि धक्का कमी होणार आहे. या वेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आहे. यावेळी शहराच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शहर विकास योजनेंतर्गत उभारलेला हा पुल शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणार आहे. पुलाच्या लोकार्पणानंतर प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला असून, वाहतुकीत सुधारणा होईल आणि शहरातील संपूर्ण वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांसाठी हा प्रकल्प फायदेशीर ठरेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वाशीहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, अपघातांची शक्यता घटेल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. शहर विकासाच्या दिशेने नवी मुंबई महानगरपालिकेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.
या प्रकल्पासाठी अंदाजे 11.5 कोटी रुपये खर्च आला असून, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यात आला आहे. मुख्य उद्देश पामबीच मार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी करणे आणि प्रवासाचा वेळ वाचवणे हा होता. एकूणच, आर्म उड्डाणपूलमुळे नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेला गती मिळणार आहे. सायन–पनवेल महामार्गाशी थेट जोडणीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थापन सुधारेल, प्रवास जलद व सुरळीत होईल आणि भविष्यातील वाढत्या वाहतुकीच्या गरजांसाठी हा पुल अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा