Navi Mumbai Airport Flights: देशांतर्गत सेवांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून आता आता आंतरराष्ट्रीय सेवांनाही सुरूवात होणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी मुंबई: मे महिन्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान सेवेचा विस्तार होणार आहे. विमानतळावरून मे 2026पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरूवात होत असल्यामुळे उड्डाणांची आणि प्रवाशांची संख्या वाढणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मते, यशस्वी देशांतर्गत सेवांनानंतर आता नवी मुंबई विमानतळ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठीही सज्ज झालं आहे. त्यामुळे आजपासून सेवांचा विस्तार होईल अशी आशा आहे.
35 उड्डाणांची शक्यता
यापूर्वी 29 मार्चपासून नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरूवात होणार असल्याची घोषणा केली होती. पण पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे ही योजना पुढे ढकलण्यात आली होती. मग त्यानंतर पुन्हा मे महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सची सुरूवात होणार असे सिडकोने जाहीर केले. यामुळे येत्या महिन्याभरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज सुमारे 35 आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे. अद्याप यासाठी तारीख जाहीर केली नाही आहे.
दुसऱ्या धावपट्टीचं काम सुरू
डिसेंबर 2025पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणांना सुरूवात झाली. तेव्हा केवळ देशांतर्गत सेवांना सुरूवात करण्यात आली होती. हळूहळू सेवांचा विस्तार होत असून विमानतळाच्या आजूबाजूने पायाभूत सुविधांचा विकाससुद्धा आता सुरू आहे. सध्या विमानतळावर केवळ एक धावपट्टी कार्यरत असल्यामुळे विमान उड्डाणांची संख्या मर्यादीत असू शकते. पण दुसऱ्या धावपट्टीचंही काम आता वेगाने सुरू आहे. पहिल्या काही महिन्यातील प्रतिसाद लक्षात घेता दुसऱ्या धावपट्टीचं काम सुद्धा सुरू केलं आहे.
विमानतळ आपल्या पूर्ण क्षमतेने सुरू होताच यावरून वर्षभरात 90 दशलक्ष प्रवासी हाताळले जाण्याचा अंदाज आहे. त्यात आता तिसऱ्या धावपट्टीचाही प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे प्रवासी हाताळण्याची क्षमता दरवर्षी 13.5 कोटींपर्यंत पोहोचू शकते. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वात व्यस्त विमान वाहतूक केंद्रांपैकी एक मानले जाणार आहे.
काही महिन्यातचं विस्तार
डिसेंबर 2025मध्ये नवी मुंबई विमानतळ दिवसाला 5,000 प्रवासी हाताळत होतं. आता एप्रिलपर्यंत ती संख्या 22,000 प्रवाशांवर पोहोचली होती. आता दररोज विमानतळावरून जवळपास 160 विमानांची वाहतूक सुरू असते. 160 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतं.
एका बाजूला विमानतळाचा विस्तार सुरू असतानाच, विमानतळावरील कनेकटीव्हीटीमुळे प्रवाशांची चिंता वाढत आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई-विरारवरून येणाऱ्या प्रवाशांनी वाहतूक व्यवस्थेबद्दल असंतोष व्यक्त केला आहे. बस सेवा रात्री उशीरा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांकडे फक्त कॅब बुक करून प्रवास करण्याचा मार्ग असतो. पण विमानतळावरून कॅब बुक करणं कठीण जात असून अनेक वेळा प्रवासी 40 -50 मिनिटं कॅबच्या प्रतीक्षेत ताटकळत राहतात.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा