![]()
ई-20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल, 80 टक्के पेट्रोल यांचेमिश्रण असलेले पेट्रोल. आता देशभरातील पेट्रोलपंपांवरहेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध आहे. इथेनॉल हेऊस, मका आणि काही अन्य कृषी उत्पादनांपासून तयारकेले जाते. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामागे सरकारतीन प्रमुख कारणे सांगते. पहिले म्हणजे प्रदूषण कमीकरणे. दुसरे म्हणजे कच्च्या तेलाची आयात कमी करणेव तिसरे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. प्रदूषण कमी करण्याचा मुद्दा योग्य असू शकतो. मात्र कच्च्या तेलाची आयात कमी होत असल्यास इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे दर का कमी झाले नाहीत? यापेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याचे सरकारही मान्य करत आहे. या पेट्रोलचा वापरकरणाऱ्यांचे म्हणणे आहे की, वाहनांचे सरासरीमायलेज 3 ते 7 टक्क्यांनी घटत आहे. तसेच या मिश्रित पेट्रोलमुळे काही जुन्या वाहनांच्या इंजिनवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असेही सांगितले जाते. अशा वाहनांसाठी दुसरा पर्याय उपलब्ध नाही. शेतकऱ्यांचाविचार केल्यास त्यांच्या ऊसाला काही दुप्पट भाव मिळतआहे का? ते तर अनेक वर्षांपासून आपला संपूर्ण ऊसविकतच आहेत. ते देखील किमान दरात. शिवाय मोठ्याप्रमाणावर इथेनॉल अमेरिकेतून आयात केले जाते .2024 च्या आकडेवारीनुसार भारताने 67.98 कोटीलिटर एथिल अल्कोहोल आयात केले होते. त्यापैकी 92टक्के म्हणजेच 62.29 कोटी लिटर अमेरिकेतून आले .सरकारचे म्हणणे आहे की, इथेनॉल मिश्रितपेट्रोलविरोधात एकही तक्रार नाही. पण आपण यापेट्रोलचा वापर काही प्रश्न न विचारता करत आहोत.जणू आपले स्वतःचे मतच उरलेले नाही. तेलघाण्याच्याबैलाप्रमाणे आपण डोके खाली घालून फिरत राहतो.मागून फटके बसत असले तरी तक्रार करण्याचे धाडसहोत नाही. सरकार करेल तेच सत्य, सरकार सांगेल तेचअंतिम सत्य. अशीच मानसिकता झाली आहे. महागाईअसो वा चुकीचे निर्णय, त्याचा आपल्यावर काहीचपरिणाम होत नाही. कारण थांबून विचार करण्यासाठीआपल्याकडे वेळच उरलेला नाही. वास्तव असे आहेकी, व्यक्ती पाहून मत बनवण्याची सवय लागली आहे.मुद्द्यांवर चर्चा करायची नाही आणि त्यांना स्पर्शहीकरायचा नाही. कारण मुद्द्यांवर बोलण्यासाठी वाचनआवश्यक असते व वाचनाशी आपला संबंधच तुटला.आपण इन्स्टाग्राम, फेसबुक व व्हॉट्सअॅपवरच अधिकविश्वास ठेवू लागलो आहोत. तिथे कोणीही काहीहीसांगितले की, तेच खरे मानण्याची सवय झाली.आपल्या मुलांनाही पुस्तकांपासून दूर नेत आहोत.कोणीतरी सांगितले, गांधीजी असे होते; आपण ते मान्यकेले. आता दुसरे कोणी म्हणते, गांधीजी तसे होते; तेहीआपण मान्य करतो. आयुष्यभर साधेपणाने जगलेल्यात्या महान व्यक्तीबद्दल आपण स्वतः कधी वाचण्याचाप्रयत्नच केला नाही. हेच नेहरूंबाबतही घडले. आजचाकाळ महान आहे, हे मान्य. त्याची तुलना होऊ शकतनाही, हेही शक्य. पण गांधी-नेहरूंचा काळ, तेव्हाच्याकठीण काळात देश उभा करणे व टिकवून ठेवणे, हीसाधी गोष्ट नव्हती. आपण पुरेसे वाचन न करता तुलनाकरतो. आपल्याला कोणत्याही विषयाशी देणे-घेणेउरलेले नाही. ज्वलंत प्रश्नांशी तर अजिबात नाही. असो, विषय ई-20 चा होता. एक केंद्रीय मंत्री म्हणतात,इथेनॉल तर अनेक वर्षांपासून पेट्रोलमध्ये मिसळले जाते.मग वाहनांचे नुकसान आधी का झाले नाही? अनेकवर्षांपासून मिसळत असतील, पण तेव्हा त्याचे प्रमाणदोन-चार टक्के होते. आता ते 20 टक्क्यांपर्यंत वाढवलेआहे. नुकसान होणार असेल तर ते होणारच. शेवटीकोणत्याही गोष्टीचा फायदा किंवा तोटा हा तिच्याप्रमाणावरच अवलंबून असतो. मग त्या प्रमाणावर चर्चाका होत नाही? कच्च्या तेलाची आयात इथेनॉलमुळे कमीहोत असेल, तर इथेनॉलमिश्रित पेट्रोलचेदर का कमी झाले नाहीत? या पेट्रोलमुळेवाहनांचे मायलेज कमी होत असल्याचेसरकारही मान्य करत आहे. शेतकऱ्यांचाऊस काही दुप्पट दराने विकला जातनाही. ते तर अनेक वर्षांपासून संपूर्ण ऊसविकतच आहेत.
Source link
नवनीत गुर्जर यांचा कॉलम:चला, ई-20 अर्थात इथेनॉलच्या पेट्रोलची व्याख्या समजून घेऊ
