Headlines

नक्षलवाद्यांचा हल्ला, हाताला दोन गोळ्या लागल्या, तरीही कमांडो शाहरुख खान लढले, 5 सहकाऱ्यांचे प्राण वाचवले, नांदेडमध्ये सत्कार


नक्षली हल्ल्यात दोन गोळ्या लागूनही नक्षलवाद्यांशी दोन हात करत 5 सहकाऱ्यांचे प्राण वाचवणारे कमांडो शाहरुख खान यांचा नांदेडमध्ये सत्कार करण्यात आला. ‘कोब्रा’ कमांडो शाहरूख खान यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Nanded News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
​नांदेड : तीन वर्षांपूर्वी झारखंडमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात नांदेडचे सुपुत्र आणि ‘कोब्रा’ कमांडो फारुकी शाहरूख खान अजीज खान हे गंभीर जखमी झाले होते. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या हाताला दोन गोळ्या लागल्या होत्या. मात्र, अशा अत्यंत बिकट आणि जखमी अवस्थेतही त्यांनी न घाबरता नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले; सोबतच आपल्या पाच सहकाऱ्यांचे प्राणही वाचवले.​ या शौर्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शाहरूख खान यांना ताम्रपट देऊन सन्मानित करण्यात आले.

​फारुकी शाहरूख खान अजीज खान हे माहूर तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबात आई आणि सहा भाऊ आहेत. 2010 मध्ये शाहरूख खान यांच्या वडिलांचे निधन झाले. स्पेशल फोर्समध्ये जाऊन कमांडो बनायचे आणि देशाचे रक्षण करायचे, हेच त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. हे स्वप्न उराशी बाळगून 2017 मध्ये शाहरूख हे सीआरपीएफ (CRPF) मध्ये भरती झाले आणि पुढे अत्यंत खडतर मानल्या जाणाऱ्या ‘कोब्रा’ बटालियनमध्ये त्यांची निवड झाली.

नक्षलवाद्यांच्या आयईडी हल्ल्यात गंभीर जखमी

‘कोब्रा’ बटालियन ही नक्षलविरोधी कारवायांमध्ये विशेष मोहिमा राबवते. जानेवारी 2023 मध्ये झारखंड राज्यातील नक्षलग्रस्त भागात ‘ऑपरेशन जुवेन्तस’ राबवण्यात आले होते. या मोहिमे दरम्यान नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी (IED) स्फोटात शाहरूख गंभीर जखमी झाले, तसेच दोन गोळ्या त्यांच्या हाताला लागल्या.

शाहरुख यांच्या अतुलनीय शौर्यासाठी पदक प्रदान

अत्यंत वेदनादायी आणि जखमी अवस्थेतही त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना करत नक्षलवाद्यांशी लढा दिला व आपल्या जखमी सहकाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढले. ​त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांची राष्ट्रपती पराक्रम पदकासाठी निवड झाली. हे पदक भारतीय लष्करी आणि निमलष्करी दलातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानले जाते.

नांदेड जिल्हा प्रशासनाकडून कौतुक

शाहरूख यांच्या या देशसेवेचे नांदेड जिल्हा प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजरोहण सोहळ्यात पालकमंत्री अतुल सावे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांना ताम्रपट देऊन गौरवण्यात आले.

कमांडो शाहरुख खान यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, राष्ट्रपती पराक्रम पदकासाठी निवड झाल्याने तसेच प्रशासनाकडून ताम्रपट देऊन सन्मान केल्याने शाहरुख खान यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज मला मिळालेला हा पुरस्कार केवळ माझा सन्मान नाही. हा माझ्या कुटुंबाच्या त्यागाचा, माझ्या मोठ्या भावांच्या संघर्षाचा, माझ्या सहकाऱ्यांच्या शौर्याचा आणि माझ्या मातृभूमीप्रती असलेल्या निष्ठेचा सन्मान आहे. शिवाय हा पुरस्कार माझ्या मोठ्या भावाला आणि देशाच्या शूर जवानांना समर्पित केल्याची भावना जवानाने व्यक्त केली आहे.

“सुदैवाने आयुष्यात अशी संधी माझ्यासमोर आली. ११ जानेवारी २०२३ रोजी एका अत्यंत कठीण आणि जीवघेण्या नक्षलविरोधी कारवाईमध्ये आम्हाला मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागलं. त्या कारवाईमध्ये अनेक नक्षलवादी मारले गेले. या चकमकीदरम्यान मी स्वतः गंभीररीत्या जखमी झालो; मात्र त्या परिस्थितीतही माझ्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आणि माझ्यावर सोपवलेलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न केला”, असं कमांडो शाहरुख खान म्हणाले.

“माझ्या शरीरावर जखमा झाल्या, पण माझ्या मनातील देशसेवेची जिद्द कधीही जखमी झाली नाही. कारण माझ्यासाठी कमांडो होणं ही केवळ नोकरी नव्हती; ती माझ्या आयुष्याची शपथ होती”, अशी भावना कोब्रा कमांडो शाहरुख खान यांनी व्यक्त केली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा