नैसर्गिक तत्त्वांपासून तयार करण्यात आलेली आणि अस्सल फुलाचा सुगंध ही पितांबरी देवभक्ती अगरबत्तीची खासियत आहे. दीर्घकाळ टिकणारा नैसर्गिक सुगंध आणि कमी धूर यामुळे ही अगरबत्ती पूजेला अधिक शांत, सुखद आणि प्रसन्न बनवते. चंदन, मोगरा, गुलाब, चंपा अशा विविध नैसर्गिक सुगंधांमध्ये पितांबरी देवभक्ती अगरबत्ती उपलब्ध करण्यात आली आहे.
पितांबरी देवभक्ती अगरबत्ती भारतातील पहिली मास-प्रोड्यूस्ड नैसर्गिक सुगंधाची अगरबत्ती असून पितांबरीने ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेऊन परंपरा, गुणवत्ता आणि नावीन्य जपण्याचा प्रयत्न या उत्पादनातून केला आहे.
या जाहिरातीची संकल्पना “देव आपल्या प्रत्येक क्षणी सोबत असतो, आपल्याला मार्गदर्शन करतो आणि आशीर्वाद देतो.” या भावनेवर आधारित आहे. भारतीय घरांमध्ये प्रत्येक दिवसाची सुरुवात देवपूजा आणि ईश्वराच्या आशीर्वादाने होते. मग तो रिक्षाचालक असो, चहावाला, दुकानदार किंवा संपूर्ण कुटुंब, प्रत्येक जण नवीन आशा घेऊन देवाच्या प्रार्थनेने दिवसाची सुरुवात करतो. पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा नैसर्गिक सुगंध प्रत्येक प्रार्थनेला देवापर्यंत पोहचवण्याचे माध्यम बनतो. ईश्वराशी अधिक आत्मीयतेने जोडल्याची अनुभूती देतो आणि प्रत्येक प्रार्थना अधिक अर्थपूर्ण बनवतो. या जाहिरातीचा मुख्य संदेश “हा देश जागतो नव्या आशा आणि स्वप्नांसह” हा असून “जिथे श्रद्धा आणि भक्ती, तिथे दरवळे पितांबरी देवभक्ती” या समर्पक टॅगलाईनने जाहिरातीचा समारोप होतो.
रितेश देशमुख यांची सहज, प्रभावी, आध्यात्मिक शैली आणि भावपूर्ण निवेदन या जाहिरातीत श्रद्धा, आणि भक्तीभाव अधिक प्रभावीपणे अधोरेखित करते.
याजाहिरातीविषयीबोलतानारितेशदेशमुखम्हणतात; “पितांबरीहादेशातीलविश्वासू, मराठमोळाआणिपरंपराजपणाराब्रँडआहे. ‘पितांबरीदेवभक्तीअगरबत्ती‘ जाहिरातीच्यामाध्यमातूनमलाभारतीयसंस्कृतीतीलश्रद्धाआणिभक्तीचेमहत्वअधोरेखितकरण्याचीसंधीमिळालीयाचाअत्यंतआनंदआणिअभिमानआहे. पितांबरीदेवभक्तीअगरबत्तीचेनैसर्गिकसुगंधखरोखरचअप्रतिमअसूनहीअगरबत्तीप्रत्येकघरातीलपूजेचामहत्वपूर्णभागबनेलअसाविश्वासवाटतो.”
या जाहिरात मोहिमेची संकल्पना आणि दिग्दर्शन महेश लिमये यांच्या ली प्रॉडक्शनने केले असून पितांबरी क्रिएटिव्ह टीमनेही यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. याच्या देशव्यापी प्रचारासाठी कंपनीने टेलिव्हिजन, प्रिंट, सोशल मीडिया या सर्व माध्यमांचा समावेश असलेली ३६० डिग्री मीडिया मोहीम आखली आहे.
याविषयी बोलताना पितांबरीप्रॉडक्ट्सप्रा. लि. चेमॅनेजिंगडायरेक्टर, डॉ. रविंद्रप्रभुदेसाई, म्हणाले, “ईश्वरावर माझी दृढ श्रद्धा आणि अढळ विश्वास आहे. भारतीय संस्कृतीत आणि प्रत्येक घरात प्रार्थनेला नेहमीच विशेष स्थान आहे. म्हणूनच पितांबरी देवभक्ती अगरबत्तीच्या माध्यमातून नैसर्गिक तत्त्वे आणि अस्सल फुलांच्या सुगंधासह पूजा-अर्चनेचा अनुभव अधिक पवित्र आणि आनंददायी करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे ही अगरबत्ती देशभरातील ग्राहकांच्या दैनंदिन पूजेचा अविभाज्य भाग बनेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
कंपनीचेव्हाइसचेअरमन, श्री. परिक्षितप्रभुदेसाई, म्हणाले, “आमच्या मजबूत वितरण प्रणालीमुळे पितांबरी देवभक्ती अगरबत्ती देशभरातील ग्राहकांना सहज उपलब्ध होऊ शकेल. विशेष म्हणजे देवभक्ती अगरबत्ती ही अस्सल फुलांचा नैसर्गिक सुगंध असलेली भारतातील पहिल्या मास-प्रोड्युस्ड अगरबत्त्यांपैकी एक आहे. ग्राहक आज शुद्धता, गुणवत्ता आणि योग्य मूल्याला अधिक महत्व देत आहेत. त्यामुळे ही अगरबत्ती ग्राहकांच्या पसंतीस उतरून देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
प्रियाप्रभुदेसाई, डायरेक्टर, पितांबरीप्रॉडक्ट्सप्रा. लि. म्हणाल्या, “देशभरात आमची जाहिरात मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी आम्ही विभागनिहाय विस्तारावर भर देणार आहोत आणि टप्याटप्याने विविध राज्यांमध्ये पोहचत आहोत. प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमांच्या सहाय्याने आमचे उद्धिष्ट भारतभरातील ग्राहकांपर्यंत पोहचणे आणि पितांबरी देवभक्ती अगरबत्तीला प्रत्येक घरातील दैनंदिन पूजेचा अविभाज्य भाग बनवणे आहे.”
देशभरात उपलब्ध असलेल्या पितांबरी देवभक्ती अगरबत्तीच्या माध्यमातून कंपनीने राष्ट्रीय अगरबत्ती बाजारपेठेत दमदार प्रवेश केला आहे. या लॉन्चमुळे पितांबरीच्या विश्वासार्ह उत्पादनांच्या श्रेणीत आणखी एका दर्जेदार उत्पादनाची भर पडली आहे. नैसर्गिक सुगंध, उत्कृष्ट गुणवत्ता आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेशी सांगड घालणारी ‘पितांबरी देवभक्ती अगरबत्ती’ देशभरातील ग्राहकांच्या दैनंदिन पूजेचा अविभाज्य भाग बनेल, असा कंपनीला विश्वास आहे.
