Headlines

दीडशे रुपये रोजंदारी, ते राष्ट्रकुल रौप्य… सायकलवरून रोजचा 40 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या ऋषिकांत सिंगची संघर्षगाथा


Rishikanta chanambam win silver: ऋषिकांत सिंग चानमबम याच्या खांद्यावर रविवारी तिरंगा अन् गळ्यात राष्ट्रकुल रौप्यपदक होते. स्नॅचमधील स्पर्धा विक्रमाशी बरोबरी करत तो अभिमानाने व्यासपीठावर उभा होता. मात्र इम्फाळच्या या २८ वर्षीय वेटलिफ्टरने किशोरवयात वेटलिफ्टिंगला सोडचिठ्ठी देत मजूर म्हणून काम केले होते.

rishikant singh chanambam
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : रविवारी पदकाची कमाई केल्यानंतर ऋषिकांतचा मोबाइल सतत वाजत होता. कुटुंब, मित्र, नेते आणि हितचिंतक साऱ्यांना त्याच्या या आनंदाच्या क्षणांत सामील व्हायचे होते. मात्र काही वर्षांपूर्वी बांधकाम मजूर म्हणून रोजचे काम मिळवण्यासाठी ऋषिकांतला परिचयातील व्यक्तींना सतत फोन करावा लागत होता. आज गळ्यात पदक असले तरी दहावर्षांपूर्वी खांद्यावर विटा आणि बांधकामाच्या साहित्याचे जड ओझे असायचे. संध्याकाळी ट्रक ऋषिकांत थांब्यांवरील खानावळीत मदतनीस म्हणूनही काम करायचा.

हे सारे आर्थिक मिळकतीसाठी होते; कारण खेळातील कामगिरी त्याला पुरेसे आर्थिक स्थैर्य देत नव्हती. ऋषिकांतकडे क्षमता नव्हती असे नाही. तो २०१७ मध्येच युवा राष्ट्रीय विजेता आणि युवा राष्ट्रकुल स्पर्धेत ब्राँझपदक विजेता ठरला होता. यामुळे ओळख मिळाली असली, तरी त्यामुळे पोट भरत नव्हते. फारसे आर्थिक पाठबळ नसल्याने त्याने वेटलिफ्टिंगला रामराम ठोकला होता.
Maharashtra TimesMirabai Chanu : ‘वेटलिफ्टिंग क्वीन’ने मुकुट राखला, मीराबाई चानूकडून राष्ट्रकुल सुवर्णपदकाची हॅटट्रिक
खेळाडू अन् त्यातही फुटबॉलपटू म्हणून लौकिक मिळवण्याची ऋषिकांतची इच्छा होती. योगायोगाने गावातील होळीच्या उत्सवादरम्यान स्थानिक क्रीडा कार्यक्रमात एका क्रीडा शिक्षकाने १२ वर्षांच्या ऋषिकांतला पाहिले अन् त्याला इम्फाळच्या भारतीय क्रीडा प्राधिकारण केंद्रात (साई) जाण्याचा सल्ला दिला. तेथे ऋषिकांतला बॉक्सिंग, फुटबॉल आणि वेटलिफ्टिंगमध्ये संधी देण्यात आली. अखेर त्याची वेटलिफ्टिंग प्रशिक्षणासाठी निवड झाली.

मणिपूरला महिला वेटलिफ्टरची परंपरा आहे. सरावादरम्यानही महिला वेटलिफ्टरच्या गुण, कौशल्याकडे जास्त लक्ष दिले जाते असे ऋषिकांतला वाटले. त्याचा उत्साह आणि गुणांना पुरेसे खतपाणी दिले जात नव्हते. मात्र यामुळे ऋषिकांतने खांदे पाडले नाहीत. त्याने २०१६ मध्ये आपले पहिले राष्ट्रीय विजेतेपद जिंकले. २०१७मध्ये मलेशियामध्ये झालेल्या राष्ट्रकुल ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत त्याने कारकिर्दीतील पहिले ब्राँझपदक पटकावले.
Maharashtra TimesZandu Kumar : कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये भारताला पहिलं पदक जिंकून देणाऱ्या झंडू कुमारचं खरं नाव वेगळंच, आई कमला देवीकडून खुलासा
माझे पहिल्या राष्ट्रकुल प्रयत्नात उपविजेतेपद पटकावणे है स्वप्नवत वाटते. माझे कुटुंब खूप आनंदी होईल. आमच्या मणिपूरला पदकविजेत्या महिला वेटलिफ्टरची परंपरा आहे. मी राष्ट्रकुल पदक पटकावणारा पहिला भारतीय पुरुष ठरलो याचा मलाही सार्थ अभिमान वाटतो आहे, असं ऋषिकांत सिंग चानमबम म्हणाला.

… अन् खेळ दूरावला

इम्फाळमधील साई प्रशिक्षक केंद्रात फक्त ज्युनिअर खेळाडूंनाच प्रशिक्षण दिले जात असल्याने वयाच्या अठराव्या वर्षानंतर ऋषिकांतचा सराव थांबला. प्रशिक्षक किंवा खेळातील तज्ज्ञांनी त्याला सल्लाही दिला नाही. ऋषिकांतचा धाकटा भाऊ अभ्यासात प्रगती करत होता. त्याचे शिक्षण थांबू नये, यासाठी ऋषिकांतने खेळ सोडून रोजंदारीचे काम करायला सुरुवात केली. यातून त्याला दिवसाला अवघे दीडशे ते दोनशे रुपये मिळत होते. जवळपास वर्षभरानंतर मणिपूर वेटलिफ्टिंग फेडरेशनचे सचिव सुनील एलंगबम यांनी इम्फाळमध्ये नव्याने सुरू झालेल्या वेटलिफ्टिंग सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये ऋषिकांतला प्रवेश दिला. ५५ किलो गटात त्याने सीनिअर स्तरावरील आपले पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले. यामुळे ऋषिकांतला नौदलात नोकरी मिळाली.

मेहनतीला पर्याय नाही

  • ऋषिकांत दररोज आपल्या घरापासून स्टेडियमपर्यंत (साई केंद्र) सायकलवरून ४० किलोमीटरचा प्रवास करत असे
  • प्रशिक्षणाची संधी आणि त्यानंतर आहारही मिळत असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजत होतो, असेही ऋषिकांत सांगतो
  • खेळाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि आहार पुरवणे त्यावेळी आपल्या पालकांना जड गेले असते, अशी आठवणही त्याने सांगितले.
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा