![]()
तालुक्यातील पैठणखेडा येथील श्रीकृष्ण प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याची बाब समोर आल्याने निवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील गंभीर समस्यांची दखल घेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाने शाळा व्यवस्थापनाला सात दिवसांत सुधारणा करून
.
पैठणखेडा येथील आश्रमशाळेतील वसतिगृहाची अवस्था, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह, पिण्याचे पाणी आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांबाबत तक्रारी पालकांनी केल्यानंतर वसतिगृहाची अपुरी तसेच काही प्रमाणात जीर्ण इमारत, आवश्यक सुविधांचा अभाव आणि त्याचा निवासी विद्यार्थ्यांच्या संख्येवर होणारा परिणाम या बाबीही विभागाच्या निदर्शनास आणून दिला. ^तालुक्यातील आश्रम शाळेतील परिस्थितीसंदर्भात सात दिवसात सुधारणा कराव्यात, यासाठी पाठपुरावा करत आहोत. शिवाय ज्या शाळेची परिस्थिती भयानक असेल तेथेदेखील सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आहोत. -दयानंद कोकरे, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, छत्रपती गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. १० ऑगस्टच्या मध्यरात्री वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. उपचारादरम्यान दीपिका लकडा, सुष्मिता मंडल आणि अनु कोरेटी या तिघींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आश्रमशाळांच्या इमारती, स्वच्छता, वसतिगृह व्यवस्था आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ^आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या सुविधा येतात. त्या उपलब्ध करुन देण्यात येतात. मात्र काही पालकांनी येथील परिस्थिती भयानक असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात आम्ही देखील पाठपुरावा करत आहोत. -अमोल बढे, मुख्याध्यापक पैठणखेडा आश्रम शाळा
आश्रमशाळेतील सुविधा अन् सुरक्षेला प्राधान्य
आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
