Headlines

तुकाराम मुंढेंच्या FDA च्या कारवाईला न्यायालयाचा दणका, ८ दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती – setback for fda from the high court stay on action against 8 milk dairies


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आपल्या धडाकेबाज आणि कडक कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे IAS तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA च्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी राज्यभरात भेसळीविरोधात एक आक्रमक आणि धडक मोहीम उघडली होती. तसंच अन्न सुरक्षेसंदर्भातही कडक पावलं उचलत खाद्यनिर्मितीत अस्वच्छता राखणाऱ्या हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली. त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या FDA च्या कारवाईचा राज्यभरात चर्चा होती. मात्र, या धडाकेबाज कारवाईच्या कायदेशीर चौकटीवर आणि नैसर्गिक न्यायतत्त्वांच्या उल्लंघनावर बोट ठेवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एफडीएच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देत मोठा झटका दिला आहे. नेमकं काय घडलंय, FDA कारवाईविरोधात कोर्टाचं दार कुणी ठोठावलं, कोर्टात नेमका युक्तीवाद काय झाला आणि FDA च्या कारवाईबाबत कोर्टानं नेमकं काय म्हटलंय तेच या व्हिडिओत पाहू…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत