Headlines

ती मरणाच्या दारात जाताना मला दिसत होती, म्हणून २० वर्षात साखर खाल्ली नाही; मिलिंद गवळींनी सांगितला भावुक प्रसंग


Milind Gawali Share Emotional Memory OF Mother :मराठी सिनेइंडस्ट्री आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी हे त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या फिटनेससाठीही ओळखले जातात. त्यांचा फिटनेस, डाएट पाहून अनेक नवीन कलाकारही थक्क होताना दिसतात.

Milind Gawali:
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई टाइम्स टीम

‘आई कुठे काय करते’ नंतर आता ‘वचन दिले तू मला’ मालिकेमुळे अभिनेते मिलिंद गवळी सध्या पुन्हा प्रकाशझोतात आहेत. प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत इतक्या वर्षांनंतरही एखाद्या मालिकेच्या केंद्रस्थानी राहण्याची संधी मिळण्यामागे, साजेशा अभिनयासह तशी अनेक कारणं आहेत. पण यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ‘फिटनेस’!

आई-वडिलांकडून मिळालेला चांगला डीएनए, जे समोर येईल ते आनंदानं खायची सवय, मांसाहार मद्यपानाकडे असलेली पाठ, हीच आपल्या तंदुरुस्तीची त्रिसूत्री असल्याचं मिलिंद सांगतात. शक्यतो घरच्या जेवणाला त्यांचं प्राधान्य असतं; अगदी शूटिंगला जातानाही ते घरून डबा नेतात. त्यातही अनेक वर्षं जेवणातभाकरीला अढळ स्थान आहे. याशिवाय, ‘गेली २० वर्षं मी साखरेचं सेवन केलेलं नाही’, असं जेव्हा ते अगदी सहजपणे नमूद करतात, तेव्हा भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत.

Maharashtra TimesTharala Tar Mag : तुरुंगातच जावांमध्ये जुंपली! एका वाक्यात सायलीने प्रियाला केलं गार, सचिनच्या माणसाची पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक; अर्जुनच्या हाती महत्त्वाची कडी
‘साखर शरीराला ऊर्जा देत असली, तरी प्रक्रिया केलेलं हे ‘सफेद जहर’ आरोग्यासाठी हानिकारकच आहे. बैठं काम करणाऱ्यांना खरं तर साखरेची आवश्यकताच नाही’, असं मिलिंद नमूद करतात. त्यांच्या साखर न खाण्यामागे आणखी एक भावनिक कारणही आहे. ‘माझ्या आईला तीव्र स्वरूपाचा मधुमेह होता. अगदी ५००च्या घरात. तरीही ती साखर सोडत नव्हती. पण साखरेमुळे ती मरणाच्या दारात जाताना मला दिसत होती. त्यावेळी तिला म्हटलं, ‘चल, मी तुला साखर सोडून दाखवतो.’ तिला ते अशक्य वाटत होतं. पण तेव्हापासून मी साखर सोडली ती सोडलीच’, असं मिलिंद सांगतात.

Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शो च्या प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, आता 3 नव्हे तर या 5 दिवसांत पाहायला मिळणार एपिसोड

Sachin Deshpande Interview : रिल्स स्टारमुळे आम्हाला कोणी विचारत नाहीये, सचिन देशपांडेंची खदखद

इतक्या वर्षांनंतरही तीच अंगकाठी, तोच उत्साह अन् तीच ऊर्जा असण्यामागचं गुपित विचारल्यानंतर, ‘तणाव हा आयुष्यातला सर्वांत मोठा शत्रू आहे. त्यासाठी आपल्या हातात आहेत, त्याच गोष्टींवर विचार करायचा. बाकी सर्व ‘वरच्या’वर सोडून द्यायचं. तुम्ही श्रीकृष्णाच्या रथात बसला आहात. त्यामुळे कितीही महाभारत घडू दे, अखेरीस विजय तुमचाच आहे, या तत्त्वावर विश्वास ठेवला, की सर्व काही सोपं होऊन जातं’, असा मूलमंत्र ते देतात.