न्हावेली /वार्ताहर : श्री सातेरी उद्दिनाथ क्लासचे संचालक अंनत ( मेहल) कांडरकर पखवाज विशारद आणि शिष्य परिवार तसेच तळवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सिध्देश्वर मंदिर तळवडे येथे शनिवार २२ ऑगस्ट रोजी गुरुवंदना सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सायंकाळी ३.३० वाजता मान्यवरांचे स्वागत,दीपप्रज्वलन,शुभेच्छा,सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांचे पखवाज सोलो वादन,सायंकाळी ५ वाजता विद्यार्थ्यांचा एकसंघ मृदुंग शिवनाद,सायंकाळी ६.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वितरण,सायंकाळी ७ वाजता नामांकित जेष्ठ बुवांचे चक्रिय भजन होणार आहे यामध्ये सहभागी बुवा शांतादुर्गा भजन मंडळ,( तेर्सेबांबार्डे कुडाळ) बुवा – काका साटेलकर, ओंकार भजन मंडळ,(सरमळे) बुवा – संजय गावडे,जयशंभो भजन मंडळ,( माजगाव) बुवा – विजय माधव,भवानी पाटेकर भजन मंडळ,(तळवडे ) बुवा – संतोष रेडकर सातेरी भजन मंडळ,(निरवडे कोनापाल) बुवा – विजय गावडे सिद्धेश्वर उद्दिनाथ भजन मंडळ,(तळवडे ) बुवा – उदय नागडे या मंडळाचा समावेश आहे.लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान समिती व गावकर मंडळी ग्रामस्थाने केले आहे.
